Ghar banduk biryani: घर बंदूक बिरयानी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज टीम नागराज पंढरपुरात आली असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हलग्याच्या कडकडाटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील यांचे आगमन झाले. यावेळी चित्रपटाची सर्व टीम त्यांच्या सोबत होती. पंढरपुरात येताना पहिल्यांदा विठुरायाचे दर्शन घेऊन टीम नागराज प्रमोशनस्थळी आली. यावेळी पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांनी या टीमचे स्वागत केले. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी दाखवल्यानंतर नागराज आणि त्यांच्या टीमने प्रेक्षकांशी संवाद साधला. फक्त रडूनच डोळ्यातून पाणी येतं, असं नाही. हे हा चित्रपट पाहून लक्षात येईल, असे सांगत आता साऊथ वाले देखील घर बंदूक बिरयानी या मराठी चित्रपटाचा रिमेक करतील, असा दावा सयाजी शिंदे यांनी केला. 


विठ्ठलाच्या दर्शनाने आम्ही सर्वच भारावून गेलो असून एक पॉझिटिव्ह ऊर्जा आम्ही येथून घेऊन जात असल्याचे अभिनेता आकाश ठोसर याने एबीपी माझाशी (Abp Majha) बोलताना सांगितले. पूर्वी मी एकादशीला पंढरपूरला येऊन लांबच लांब रांगेत दर्शनासाठी उभा राहत असे. पण आज देवाचे खूप सुंदर दर्शन झाले असल्याचे आकाशने सांगितले. गेले काही दिवस प्रमोशनसाठी फिरत असताना कालपर्यंत मला खूप डाऊन वाटत होते. पण आज विठ्ठलाच्या दर्शनाने मी पूर्ण चार्ज झाल्याचे आकाशने सांगितले. 


सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेमी आणि त्यांचे वनराईसाठी असलेले काम सगळ्यांनाच माहित आहे. आज त्याचीही आठवण आकाशने सांगितली. चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना  सयाजी शिंदे यांना रोज कोणत्या ना कोणत्या वृक्षतोडी संदर्भात फोन यायचे. अशावेळी ते आधी तो विषय संपवायचे मग शुटिंगकडे वळायचे, अशी आठवण आकाशने सांगितली. 


नागराजच्या टीममध्ये आरची उर्फ रिंकू राजगुरू दिसत नसल्याने, याबाबत विषय चढला असता नागराज मानिले म्हणाला की, तिच्या सारखा रोल असेल त्यावेळी ती पुन्हा दिसेल. या चित्रपटात त्याने अभिनय केल्याचे सांगताना हा चित्रपट मोठा धमाका करेल असा विश्वास व्यक्त केला.  नागराजच्या चित्रपटातील नायिकेची तुलना आर्चिसोबत होईल अशी भीती वाटते का? असं सायली पाटीलला विचारले असता तिने असं काहीही वाटत नसल्याचे सांगितले. 


इतर महत्वाची बातमी:


IIT Mumbai Darshan Solanki : मोठी बातमी! IIT मुंबईचा विद्यार्थी दर्शन सोलंकीची सुसाइड नोट पोलिसांच्या हाती; महत्त्वाची माहिती आली समोर