Gautami Patil Tu Morni Song Modern Look:महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) तिच्या अदाकारासाठी ओळखली जाते. तिनं नृत्य आणि दिलखेचक अदांनी प्रेक्षकांना मंत्रमु्ग्ध (Gautami Song) केलं. गौतमी पाटील केवळ स्टेज परफॉर्मन्स करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत नाही. तर, तिचे साँग अल्बम्सना देखील प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. गौतमी पाटीलचा चाहतावर्ग मोठा आहे.  दैनंदिन अपडेट्स शेअर करुन  गौतमी आपल्या आयुष्याच्या निगडीत अपडेट्स देत राहते. तसेच मनोरंजनात्मक व्हिडीओही शेअर करते. गौतमीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी. गौतमी लवकरच आपल्या आगामी गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.   'तू मोरनी' (Tu Morni) असे गाण्याचे बोल असून,  या गाण्यातून गौतमीने पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित केलं आहे.

नव्या गाण्यातून गौतमी पाटीलचं मॉडर्न लूक (Marathi dancer Gautami Patil new song)

 

गौतमी पाटील नेहमी खास नव नवीन साँग अल्बममधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. गौतमी लवकरच 'तू मोरनी' या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  या गाण्यात गौतमी पाटीलचा खास लूक पाहायला मिळत आहे.  गौतमीचा हा खास लूक प्रेक्षकांनी आजवर कधी न पाहिलेला आहे. तिचं नवं रुप या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिनं खूप सुंदर आणि मॉर्डन लूक कॅरी केला आहे. तिच्या नेहमीच्या पारंपरिक मराठमोळ्या लूकपेक्षा या गाण्यातील तिचे लूक चर्चेचा विषय ठरत आहे. 

गौतमी पाटीलनं नव्या गाण्यासाठी कॅरी केला मॉर्डन लूक

या गाण्याबद्दल बोलताना गौतमी सांगते "आजवरच्या लूकमधला या गाण्यामध्ये असलेले सगळेच लूक खूप वेगळे, हटके आणि मॉर्डन होते. या वेळी गाणं करताना थोडं दडपण आणि धाकधूक देखील होती. कारण मॉर्डन लूकमध्ये मी पहिल्यांदा परफॉर्म केला आहे. आपला नवा अंदाज प्रेक्षकांना किती आवडेल, याची शंका होती. पण गाणं आल्यापासून खूप छान प्रतिक्रिया येत आहेत. यातून अजून असे नवनवीन लूक करण्याचा आत्मविश्वास मिळतोय",  असं गौतमी म्हणाली.

'तू मोरनी' या गाण्यामध्ये नटखट अंदाजात दिसलेली गौतमी आता पुढे अजुन कोणत्या नव्या प्रोजेक्ट्सचा भाग होणार हे बघणं उत्कंठावर्धक ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रितेशचं भावूक भाषण, जिनिलियाचा हुंदका, कंठ दाटला, डोळ्यात पाणी; 'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँचमधील व्हिडिओ व्हायरल