Gautami Patil: मराठी सिनेचाहत्यांना आपल्या सोशिक अभिनयानं रडवणारी अभिनेत्री अलका कुबल, बोल्ड ॲन्ड ब्युटिफुल सई ताम्हणकर आणि महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील यांचा किलर कॉम्बो एकत्र झळकणार असल्याची सध्या एकच चर्चा आहे. याचं कारण आहे गौतमी पाटीलनं शेअर केलेला व्हिडिओ. या व्हिडिओत गौतमी अभिनेत्री अलका कुबल, सई ताम्हणकर आणि आणखी काही कलाकारांना भेटत त्यांच्याशी गप्पा मारताना दिसली. सोशल मिडियावर तिनं या भेटीचा व्हिडिओ शेअर केलाय. त्यामुळे आता गौतमी सई आणि अलका कुबल यांच्यासोबत काही नवा प्रोजेक्ट करतेय का? अशी चर्चा रंगली आहे.
आपल्या नखरेल अंदाजानं नुकतीच लाईक शेअर सबस्क्राईबमध्ये लिंबू मारला गाण्यात अमेय वाघसोबत गौतमी थिरकताना दिसली होती. या आयटम साँगला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सोशल मीडियावरचा तिचा हा व्हिडिओ चर्चेत आलाय.
गौतमीनं व्हिडिओ शेअर करत लिहिलं..
गौतमीनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गौतमी अलका कुबल, संजय खापरे, बिगबॉसफेम शिव ठाकरे यांच्याशी बोलताना दिसत आहे. त्यानंतर त्यांच्या संभाषणात सई ताम्हणकरही आल्याचं दिसलं.हा व्हिडिओ मॉलच्या आवारातला किंवा एअरपोर्टवरचा असल्याचं दिसतंय. या व्हिडिओत गौतमी सगळ्यांशी भेटून बोलताना दिसतेय. खूप छान वाटले सगळ्यांना भेटून असं लिहित तिनं हा व्हिडिओ पोस्ट केलाय.ही भेट योगायोगानं झाली होती की गौतमी सई आणि या टीमसोबत कुठला प्रोजेक्ट करतेय याचा खुलासा अजून तिनं केला नाहीय.त्यामुळं गौतमी नक्की काय करतेय याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
मकरंद अनासपुरेंसोबत मूषक आख्यानमध्ये दिसली गौतमी
सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा ‘मूषक आख्यान’ हा चित्रपट 8 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला.चित्रपटात मकरंद यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिची ठसकेबाज लावणी हे ‘मूषक आख्यान’ चित्रपटाचे विशेष आकर्षण होते.
लिंबू मारला गाणं व्हायरल
'लाईक्स आणि सबस्क्राईब' या सिनेमातून गौतमी पाटील प्रेक्षकांच्या भेटीला आली.हा सिनेमा आता ओटीटीवरही आला आहे. त्याच्या एका गाण्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. विशेष म्हणजे या गाण्यात अमेयसोबत गौतमी पाटीलही दिसतेय. लिंबू फिरवलं असं या गाण्याचं नाव असून सोशल मीडियावरही हे गाणं तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय.
हेही वाचा:
Ankita Walavalkar: कोकण हार्टेड गर्लला प्रीवेडिंगचे वेध! नवऱ्यासोबत फोटो टाकत चाहत्यांनाच विचारलं..