Gautami Patil entry in devmanus : नृत्यांगणा गौतमी पाटील हिने गेल्या काही वर्षात तिच्या डान्स स्टाईलने संपूर्ण महाराष्ट्रावर अक्षरश: मोहिनी घातली आहे. (Gautami Patil entry in devmanus) महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात गौतमी पाटीलने डान्स स्टेज गाजवले आहेत. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान, आता गौतमी पाटील टिव्ही मालिकांमध्ये (Gautami Patil entry in devmanus) झळकलेली पाहायला मिळत आहे. तिने एका मराठी मालिकेत एन्ट्री (Gautami Patil entry in devmanus) घेतली आहे. 

Continues below advertisement

Continues below advertisement

झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेत नृत्यांगणा गौतमी पाटील पाहायला मिळणार आहे. झी मराठीने या मालिकेतील गौतमीची पहिली झलक इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. यात गौतमी पाटील देवमाणूस मधील अजित कुमार म्हणजेच किरण गायकवाडशी (Kiran Gaikwad) संवाद साधताना दिसत आहे. 

माझ्यावर चान्स मारण्यासाठी माप घेतोयस ना? गौतमी पाटीलचा सवाल

झी मराठीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील अजित कुमारकडे ब्लाऊज शिवून घेण्यासाठी आलेली पाहायला मिळत आहे. यावेळी अजित कुमार तिला म्हणतो की, मी जुन्या मापांवर काम करत नाही. मी डायरेक्ट माप घेतो. दरम्यान, अजित कुमारला प्रत्युत्तर देताना गौतमी पाटील म्हणते, काळजावर हात ठेऊन खरं सांग.. माझ्यावर चान्स मारण्यासाठी माप घेतोयस ना? तुला मी कोण आहे माहिती आहे ना? 

गौतमीच्या या प्रश्नांवर प्रत्युत्तर देताना म्हणतो, तुम्ही कोणाची तरी बहीण आहात. कोणाची बायकोही असाल. अजित कुमारचं हे उत्तर ऐकताच गौतमी पाटील म्हणते, माझं अजून लग्न झालेलं नाही. दरम्यान, या नंतर अजित कुमार गौतमीचं माप घेताना पाहायला मिळतोय. 

नृत्यांगणा गौतमी अजित कुमारची शिकार करणार?

सबसे कातिल' गौतमी पाटील अजित कुमारची करणार का शिकार? असं कॅप्शन देत झी मराठीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. देवमाणूस ही मालिका प्रेक्षकांना रोज रात्री 10 वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. गौतमी पाटीलचा या मालिकेतील अभिनय पाहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. झी मराठीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'फुल और कांटे'मधील अभिनेत्री पार्टीमध्ये तुफान नाचली, वयाच्या 56 व्या वर्षीही दिसते कमाल; हेमा मालिनी यांच्यासोबत खास नातं VIDEO

दोन मुलांची आई, वयाची 50 वर्षे पूर्ण, 25 वर्षीय तरुणीला लाजवणारा शिल्पा शेट्टीचा फिटनेस; पाहा फोटो