Alia Bhatt : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटची (Alia Bhatt) प्रमुख भूमिका असलेला गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरमधील आलियाच्या डॅशिंग स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनेक लोक आलियाच्या अभिनयाचं आणि लूकचं कौतुक करत आहेत. जेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट आलियानं पाहिल्यांदा ऐकली होती तेव्हा ती घाबली होती, असं तिनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
एका मुलाखतीमध्ये आलियानं सांगितलं की, 'जेव्हा गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची ऑफर मला आली तेव्हा मी हे करू शकते की नाही, अशी माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली. मी पहिल्यांदा जेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मी घबरले होते. मी माफिया क्विन ऑफ मुंबई हे पुस्तक देखील वाचलं नव्हतं तसेच मला गंगूबाई यांच्याबद्दल काहीच माहित नव्हत. मी अशा प्रकारच्या चित्रपटाबद्दल विचार देखील केला नव्हता. '
पुढे आलियानं सांगितलं, 'मी गंगूबाई यांच्या दुनियेमध्ये दोन वर्ष राहिले. शूटिंग संपल्यानंतर मी संजय लिला भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये जात होते आणि चित्रपटातील काही सिन पाहात होते. ' 25 फेब्रुवारी रोजी गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आलियासोबतच अजय देवगन आणि विजय राज या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
हेही वाचा :
- Gangubai Kathiawadi : रणवीर सिंगकडून आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चं जोरदार प्रमोशन, ‘ढोलिडा’वर धरला ठेका!
- Prajaktta Mali : ‘लहान तोंडी मोठा घास…पण आता बोलायला हवे!’, प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha