Friends: The Reunion: टेलिव्हिजन विश्वात 90 च्या दशकात गाजलेल्या सुपरहिट सिटकॉम 'फ्रेंड्स' या कार्यक्रमातील कलाकाल एका खास भागासाठी म्हणजेच Friends: The Reunion साठी पुन्हा एकदा एकत्र आले. सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून याचीच चर्चा सुरु आहे. जेनिफर अॅनिस्टन, कर्टेनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेविड शिमर हे जवळपास 17 वर्षांनंतर फ्रेंड्सच्या सेटवर एकत्र दिसले. जवळपास एका वर्षापासून किंबहुना त्याहीआधीपासून या कलाकारांनी एकत्र यावं असं म्हणत या कलाकारांकडेच चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर एचबीओनं चाहत्यांची ही मागणी पूर्ण केली. 


'फ्रेंड्स' या लोकप्रिय कार्यक्रमातून अनेकांच्याच मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मंडळींना एकत्र आणण्यासाठी तितकंच तगडं मानधनही मोजलं गेलं असलं कळत आहे. वेरायटीनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या खास भागासाठी कलाकारांना जवळपास, 2.5 मिलियन डॉलर्स इतकं मानधन देण्यात आलं आहे. भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झाल्यास ही रक्कम जवळपास 18.2 कोटी रुपयांच्या घरात जाते. 


MGN- Amazon : हॉलिवूडचा सुप्रसिद्ध MGM स्टुडिओ अमेझॉन खरेदी करणार


नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या कार्यक्रमांपैकी एक 


आधी ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रसारित केली जात होती. पण, आता एचबीओ मॅक्सच्या माध्यमातून हे कलाकार सर्वांच्या भेटीला येत आहेत. या कार्यक्रमाच्या स्वामित्त्व हक्कासाठी 425 मिलियन डॉलर इतकी किंमत देण्यात आल्याचं कळत आहे. मागील कित्येक वर्षे हा कार्यक्रम नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या कार्यक्रमांच्या यादीत समाविष्ट आहे. 


द न्यूयॉर्क टाईम्सनं 1996 मध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार प्रत्येक कलाकाराला प्रत्येक भागासाठी 22500 डॉलर मिळणार होते. ज्यानंतर कार्यक्रमाला मिळणारी लोकप्रियता पाहून कलाकारांनी मानधनात 100,000 डॉलर्सची वाढ व्हावी अशीही मागणी केली. 


10 व्या पर्वालसाठी मिळाले प्रत्येक भागाचे 1 मिलियन डॉलर 


असं म्हटलं जातं की, या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वामध्ये डेविड आणि जेनिफर यांच्या मानधनात वाढ झाली. पाचव्या पर्वापर्यंत त्यांना प्रत्येक भागाचे 100, 000 डॉलर मिळत होते. ज्यानंतर अखेरच्या म्हणजेच 10 व्या पर्वापर्यंत त्यांना प्रत्येक भागासाठी 1 मिलियन डॉलर इतकं मानधन मिळत होतं.