Mumbai Crime News: सिनेविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील ओशिवरा परिसरात एका लेखक दिग्दर्शक आणि स्ट्रगलिंग मॉडेलच्या घरावर गोळीबाराची घटना घडली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या नालंदा सोसायटीमध्ये संध्याकाळच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. तसेच घटनास्थळावरून पळ काढला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. अज्ञात आरोपीनं नेमका गोळीबार का केला? याचा तपास सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लेखक आणि दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा (45) हे नालंदा सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात. तसेच स्ट्रगलिंग मॉडेल प्रतीक बैद (29) हे बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर राहतात. दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये गोळ्यांचे निशाण आढळले. सायंकाळच्या सुमारास गोळीबार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच, ओशिवरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून तपास सुरू केला. गोळी नेमकी कुणी मारली? कुणाला नेमकं लक्ष्य केले? हे सध्या स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.
डीसीपी झोन 9 दीक्षित गेडाम म्हणाले, "ओशिवरा येथील नालंदा इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील प्रत्येक फ्लॅटच्या बाहेर एक गोळी आढळली आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे". मुंबई पोलिसांच्या पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत सिंह दलिया म्हणाले, "इमारतीच्या भितींवर गोळ्याचे निशाण आणि लाकडी पेटी आढळली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे". दरम्यान, पोलीस इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. पोलीस पथक सध्या आरोपींचा शोध सुरू आहे.
सलमान खानच्या घरावर गोळीबार
सेलिब्रिटींच्या घरावर गोळीबाराच्या घटना घडत आल्या आहेत. याआधी देखील सलमान खान याच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील फ्लॅटवर अज्ञात आरोपीनं गोळीबार करण्यात आला होता. बऱ्याचदा सलमान खानला जीवे मारण्याची देखील धमकी मिळाली आहे. तसेच कॉमेडीयन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
‘तारक मेहता’मध्ये मोठा ट्विस्ट! पोपटलालचं लग्न ठरणार? पण आधी पूर्ण करावी लागणार खास अट