Controversy Erupts Over Manoj Bajpayee’s ‘Ghuskhore Pandit’: मनोज बाजपेयी यांच्या 'घुसखोर पंडत' या वेब फिल्मच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार, या चित्रपटाच्या दिग्दर्शक आण संपूर्ण टीमविरोधात   एफआयआर दाखल करण्यात आाला आहे. लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात  या चित्रपटाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लखनऊ कमिशनरेटच्या म्हणण्यांनुसार, समुदायाच्या भावना दुखावणाऱ्या आणि शांतता भंग  करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल.

Continues below advertisement

लखनऊ पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या घुसखोर पंडत या वेब फिल्मविरोधात हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या चित्रपटावर सामाजिक भावना दुखावल्या जात असल्याचा  आरोप आहे. या चित्रपटाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,  या चित्रपटाचे शीर्षक एका  विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून त्यांचा अपमान करण्यात येत आहे. दरम्यान, ब्राह्मण समुदाय आणि अनेक सामाजिक संघटनांनी चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी या चित्रपटाविरोधात हिंसक निषेध करण्याची धमकी दिली आहे.  या चित्रपटाविरोधात पोलिसांनी तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल केला आहे.

Continues below advertisement

उत्तर प्रदेश पोलिसांनी  सांगितले की,  ट्रेलरवर आक्षेप घेतल्यानंतर हजरतगंज पोलीस स्टेशनचे एसएचओ विक्रम सिंह यांनी तक्रारीच्या आधारे एफआयार दाखल केला आहे.

या महिन्याच्या सुरूवातीला 'नेक्स्ट  ऑन नेटफ्लिक्स' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात  अनेक वेब चित्रपट आणि आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाची माहिती देण्यात आली होती. याच कार्यक्रमादरम्यान, घुसखोर पंडतचा देखील टीझर  प्रदर्शित करण्यात आले. यामुळे लगेचच वाद निर्माण झाला.  या प्रकरणावर चित्रपटाचे निर्माते नीरज पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आमचा हा चित्रपट एक पोलिसावर आधारीत एक काल्पनिक नाटक आहे.  ही कथा एका माणसाच्या कृती आणि निवडींवर आधारीत आहे.  हा चित्रपट कोणत्याही जाती, धर्म किंवा  समुदायावर भाष्य करत नाही", असं त्यांनी स्पष्ट केलं.