Father’s Day 2022 : आज अनेक जण त्यांच्या वडिलांसोबत 'फादर्स-डे' (Father’s Day) सेलिब्रेट करत आहेत. काही सेलिब्रिटींसाठी हा फादर्स-डे खास असणार आहे. कारण पहिल्यांदाच हे सेलिब्रिटी त्यांच्या चिमुकल्यांसोबत फादर्स-डे साजरा करणार आहेत. जाणून घेऊयात कोणते सेलिब्रिटी हे पहिल्यांदाच फादर्स-डे साजरा करणार आहेत....
निक जोनास (Nick Jonas)
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती हे जानेवारी 2022 मध्ये सेरोगसीद्वारे आई-बाबा झाले. निक आणि प्रियांकानं त्यांच्या लेकीचं नाव 'मालती मेरी चोप्रा जोनास' असं ठेवलं. निकचा हा पहिला फादर्स-डे आहे.
निकितिन धीर (Nikitin Dheer)
12 मे 2022 रोजी अभिनेता निकितिन धीर आणि कृतिका सेंगर यांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले. निकितिन आणि कृतिकानं त्यांच्या मुलीचे नाव देविका असं ठेवलं आहे. निकितिन देखील या वर्षी पहिल्यांदाच फादर्स-डे साजरा करणार आहे.
हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa)
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना 3 एप्रिल रोजी पुत्रप्राप्ती झाली. भारती आणि हर्ष त्यांच्या मुलाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. हर्षसाठी हा फादर्स-डे स्पेशल असणार आहे कारण पहिल्यांदाच तो त्याच्या मुलासोबत हा दिवस सेलिब्रेट करणार आहे. हर्ष आणि भारतीनं त्यांच्या मुलाचं नाव ‘लक्ष्य’ असं ठेवलं आहे.
गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary)
अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांना तीन एप्रिल रोजी कन्यारत्न प्राप्त झालं. देबिना आणि गुरमीत यांनी त्यांच्या मुलीचे नाव लियाना असं ठेवलं आहे.