Farmani Naaz: सध्या सोशल मीडियावर फरमानी नाज (Farmani Naaz) या गायिकेची चर्चा सुरु आहे. 'हर हर शंभू' हे गाणे गात फरमानीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हे गाणे सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. ‘हर हर शंभू’ हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, फरमानी नाजने आता आणखी एक गाणे गायले आहे. शिवभक्तीनंतर फरमानी नाज ‘कृष्ण’ भक्तीत रममाण झाली आहे. तिचे नवे गाणे 'हरे हरे कृष्णा' हे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तिच्या या गाण्यालाही लोक खूप शेअर करत आहेत.


फरमानीने गायलेल्या ‘हर हर शंभू’ या गाण्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. एकीकडे हे गाणे व्हायरल होत असताना, दुसरीकडे कट्टरपंथीयांकडून फरमानी नाजला धमक्या मिळू लागल्या होत्या. मात्र, या धमक्यांना आणि विरोधाला न जुमानता आता तिने कृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने तिचे नवे गाणे प्रदर्शित केले आहे. या गाण्यात तिने कृष्णाचे भजन गायले आहे.


पाहा व्हिडीओ :



फरमानी नाजच्या ‘हरे हरे कृष्णा’ या नव्या गाण्याला देखील एक मिलिअन व्हूज मिळाले आहेत. फरमानी सध्या तिच्या ‘हर हर शंभू’ आणि ‘हरे हरे कृष्णा’ या गाण्यांमुळे चर्चेत आहे.


कोण आहे फरमानी नाज?


फरमानी उत्तरप्रदेशातील मोहम्मदपुर या गावची रहिवासी आहे. 2017 मध्ये फरमानी इमरानसोबत लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर फरमानीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. या दरम्यान फरमानी आणि इमरान यांच्या संसारवेलीवर मोहम्मद अर्श नावाचे फुल उमलले. मुलाच्या जन्मानंतर इमरानने दुसरं लग्न केलं. त्यामुळे फरमानीने इमरानचे घर सोडले आणि मोहम्मदपुरचा रस्ता पकडला. फरमानीला लहानपणापासूनच गाणं गाण्याची प्रचंड आवड होती. दरम्यान फरमानीचं गाणं राहुल नावाच्या एका व्यक्तीने ऐकलं आणि ते रेकॉर्ड करून युट्यूबवर टाकलं. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर फरमानीने स्वत:चं युट्यूब चॅनल सुरू केलं. युट्यूबवर फरमानीचे 38.4 लाख सब्सक्रायबर आहेत. फरमानची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.


हिंदू धर्म स्वीकारणार ही अफवा!


‘हर हर शंभू’ गाण्यामुळे चर्चेत आलेली फरमानी नाज ही हिंदू धर्म स्वीकारणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र, आता त्यावर तिने स्पष्टीकरण दिले आहे. फरमानी म्हणाली, 'कोणीतरी माझ्या नावाने फेक ट्विटर अकाऊंट बनवले आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे की, मी हिंदू धर्म स्वीकारणार आहे. माझे पूर्वज देखील गेल्या काही वर्षांपासून हिंदू धर्माची पूजा करत आहेत, असंही या ट्विटर आयडीच्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं. हे सर्व  खोटं आहे. लोक अफवा पसरवत आहेत. अशा लोकांच्या ट्विटर आयडीला रिपोर्ट करा. त्या लोकांना सांगा की कोणाबद्दल विचार न करता असं करु नका. फरमानी नाज 786 हा माझा खरा ट्विटर आयडी आहे.'


हेही वाचा: 


Bigg Boss 16 : भाईजानच्या बहुचर्चित कार्यक्रमात फरमानी नाजची एन्ट्री? 'बिग बॉस 16' लवकरच होणार सुरू


Farmani Naaz : 'हर हर शंभू' गायिका हिंदू धर्म स्वीकारणार? पाहा काय म्हणाली फरमानी नाज