मुंबई : प्रत्येकाचे दिवस असतात. साधारण 1998 ते 2000 या वर्षाच्या अलिकडे पलिकडे असाच एक नट होऊन गेला होता. त्याचं नाव फरदीन खान. नव्या जनरेशनला तो माहीत असेल की नाही माहीत नाही. पण सध्या चाळीशीत असलेल्यांना तो आठवत असेल. तर आता पुन्हा एकदा फरदीनचं नाव येण्यामागचं कारण असं की सध्या तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फरदीनने जे सिनेमे केले होते तेव्हा तो चर्चेत होताच. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे ते त्याच्या वजनामुळे आणि काही खासगी गोष्टींमुळे.
फरदीन खान आणि नताशा यांनी लग्न केलं. दोघे सेटल झाले. फरदीनने त्यावेळी सिनेमे केले, .जे केले ते चालले. पण त्यानंतर अचानक तो गायब झाला. अर्थात त्याला कारणही तसंच होतं. नार्कोटिक्स ब्युरोच्या सापळ्यात तो अडकल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर त्याने या इंडस्ट्रीला रामराम ठोकला आणि तो गायब झाला. अधेमध्ये त्याचे फोटो यायचे. पण तो कमालीचा जाड झाला होता. याचा अर्थ त्याने इंडस्ट्री सोडली होती. जंगल, लव्ह के लिये कुछ भी करेना, ओम जय जगदिश, हे बेबी, पार्टनर आदी सिनेमे त्याने केले. त्याला पदार्पणात प्रेमअगन सिनेमासाठी फिल्मफेअरही मिळाल. पण नंतर त्याने इंडस्ट्री सोडली. पत्नी नताशासोबत तो लंडनला गेला. आणि तिथे त्याचं वजन वाढलं. गोलमटोल झालेला फरदीन अनेकांनी पहिला.
आता तेच फरदीनने आपलं वजन कमी केलं आहे. थोडं थोडकं नव्हे तर तब्बल 18 किलो. त्याचे बीफोर आणि आफ्टर फोटो आता सगळीकडे येऊ लागले आहेत. वजन कमी केल्यामुळे मी एकदम तिशीत आलोय की काय असं मला वाटू लागलं आहे. पण अजूनही मला हे वजन कमी करायचं असून 25 वर्षांमध्ये मला यायचं आहे. मनाने मी पंचविशीत आहे. पण माझा लठ्ठपणा कमी करून मला त्या वयात असल्यासारखं दिसायचं आहे असं तो म्हणतो. योग्य आहार आणि व्यायाम याच्या जोडीने हे शक्य झाल्याचं तो सांगतो.
आपण लंडनला का गेलो हेही तोसांगतो. तो म्हणाला, माझी पत्नी नताशा आणि मला अपत्य हवं होतं. पण त्यात थोड्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे आयव्हीएफ करणं गरजेचं होतं. अशावेळी मला पत्नीसमवेत असणं आवश्यक होत. हे लक्षात घेऊन आम्ही लंडनला जायचा निर्णय घेतला असं तो सांगतो. फरदीन हा फिरोझ खान यांचा मुलगा. त्यामुळे फरदीनकडून अपेक्षा बाळगल्या जात होत्या. अनेक जाहिरातीमध्येही तो होता. फरदीन पुन्हा चर्चेत यायचं कारण कदाचित त्याला पुन्हा सिनेइंडस्ट्रीत यायचं असावं.