Famous Actor Struggle With Blood Cancer: सुप्रसिद्ध अभिनेत्याला ब्लड कॅन्सरचं (Blood Cancer) निदान झाल्यामुळे अवघी फिल्म इंडस्ट्री हादरली आहे. कधीकाळी दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री (South Film Industry) गाजवणाऱ्या हा 60 वर्षांचा अभिनेता पवन कल्याण (Pawan Kalyan) आणि थलापती विजय (Thalapathy Vijay) सारख्या सुपरस्टारचा गुरु असल्याचं म्हटलं जातं. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून शिहान हुसैनी (Shihan Hussaini) आहेत. मार्शल आर्ट्स प्रशिक्षक, धनुर्विद्या तज्ज्ञ, शिल्पकार, अभिनेता, होस्ट आणि चित्रकार अशा अनेक क्षेत्रांत प्रभुत्व मिळवलेले शिहान हुसैनी फिल्म इंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन अंदाजांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. पण, अलिकडेच त्यांनी त्यांच्या आजारपणाबाबत खुलासा केला आहे. त्यांना ब्लड कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं आहे. ते ब्लॅड कॅन्सरशी झुंज देत असून अप्लास्टिक एनीमिया ग्रस्त असल्याची माहिती हुसैनी यांनी स्वतः दिली.
लाडक्या अभिनेत्याच्या आजारपणाबाबत माहिती मिळताच चाहते खूपच निराश आणि अस्वस्थ झाले आहेत. अलिकडेच, त्यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल आणि संघर्षाबद्दल चाहत्यांना माहिती दिली. तसेच, दिग्गज अभिनेत्यानं त्याचे शिष्य आणि जुने विद्यार्थी पवन कल्याण आणि थलापती विजय यांना एक खास विनंतीही केली आहे. अभिनेत्याची विनंती ऐकून चाहत्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत. अशातच आता आपल्या गुरूंच्या विनंतीला मान देऊन दोन दिग्गज अभिनेते काय पावलं उचलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दररोज दोन युनिट ब्लडची भासते गरज
गलाटा इंडियाशी बोलताना, शिहान हुसैनी यांनी त्यांचं आजरपण आणि भयंकर कॅन्सरशी दोन हात करताना येणाऱ्या समस्या चाहत्यांसमोर मांडल्या. तसेच, ते भयंकर आजारावर कसे उपचार घेत आहेत, हे देखील सांगितलं. हुसैनी म्हणाले की, "प्रत्येक दिवस संघर्षाचा असतो, पण मला कराटेची आवड आहे... कर्करोगामुळे मला जे करायला आवडतं, ते मी करू शकत नाही आणि ते म्हणजे मार्शल आर्ट्स आणि धनुर्विद्या." पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यांना दररोज दोन युनिट रक्ताची गरज आहे. तसेच, मी माझं प्रशिक्षण केंद्र विकत आहे, जे माझ्यासाठी मंदिरासारखं आहे', असं म्हणत शिहान हुसैनी यांनी त्यांचे विद्यार्थी कल्याण कुमार (पवन कल्याण) आणि थलपती विजय यांना त्यांचं प्रशिक्षण केंद्र खरेदी करण्याची विनंती केली आहे.
शिहान हुसैनी म्हणाले की, "तुम्हा सर्वांना माहिती आहे, मीच त्यांचं नाव पवन ठेवलं होतं. मला माहीत आहे की, जर हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर, ते मी जे सांगतोय, त्यामध्ये निश्चितच लक्ष देतील. पण मला आशा आहे की, ते हे केंद्र विकत घेतील आणि आज जसं सुरू आहे, अगदी तसंच चालवत राहीतील. मला माहीत आहे की, दोघांनीही त्यांच्या आयुष्यात खूप उंची गाठली आहे आणि आता सध्या एक उपमुख्यमंत्री आहे, पण मी त्यांना तेव्हापासून ओळखतो, जेव्हा ते माझ्याकडून प्रशिक्षण घ्यायचे, प्रशिक्षण केंद्र स्वच्छ करायचे, मला चहा द्यायचे. आम्ही सर्वत्र मार्शल आर्ट्स घेण्याच्या आमच्या स्वप्नाबद्दल गप्पा मारायचो. मला आशा आहे की, आता दोघेही ते स्वप्न पूर्ण करतील."
आजारपणाबाबत बोलताना शिहान हुसैनी म्हणाले की, "डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की, मला ल्युकेमिया आहे. याची एकूण तीन कारणं आहेत. ते माझ्या अनुवांशिक समस्येमुळे असू शकतं किंवा ते एखाद्या विषाणूमुळे असू शकतं किंवा ते एखाद्या प्रकारच्या धक्क्यामुळे असू शकतं. मला ल्युकेमिया होणार होता. मी त्याविरुद्ध लढेन. मी लाखो लोकांना कराटे शिकवलं आहे. फक्त भित्राच मृत्यूला घाबरतो, हिरो नाही." याच संदर्भात ते पुढे म्हणाले की, "माझे मित्र सरकारला विनंती करू शकतात. ते म्हणाले की, ते क्राउडफंडिंग करू शकतात. मी कोणाचीही मदत घेणार नाही. माझ्याकडे मालमत्ता आहे. मी ते विकून माझे वैद्यकीय उपचार करेन."
हुसैनी यांची कारकीर्द
शिहान हुसेनी यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुन्नकाई मन्नन' या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या उत्तम अभिनयाने छाप सोडली. त्याच्या नावावर 'वेलाइकरन', 'मूंगिल कोट्टई' आणि 'उन्नई मोती कुरुमल्ली' असे काही उत्तम चित्रपट आहेत. हुसैनी यांनी रजनीकांत अभिनीत 'ब्लडस्टोन' या हॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. तो थलापती विजयच्या 'बद्री' चित्रपटातही दिसला होता. गेल्या वर्षी अभिनेत्याचा 'चेन्नई सिटी गँगस्टर' हा चित्रपट प्रदर्शित झालेला. त्यांनी शेवटचा 'काठू वाकुला रेंदू काधल' मध्ये अभिनय केलाय. 60 वर्षीय अभिनेत्यावर सध्या कर्करोगावर उपचार घेत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :