Esha Gupta On Affair With Hardik Pandya: 'दोन-तीन वेळा भेटलो, काही महिन्यांपर्यंत...'; हार्दिक पांड्यासोबतच्या अफेअरवर प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलं मौन, नेमकं काय घडलं?
Esha Gupta On Affair With Hardik Pandya: बऱ्याच दिवसापासून अभिनेत्री ईशा गुप्ता आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच ईशा गुप्तानं मुलाखतीत बोलताना क्रिकेटरसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
Esha Gupta On Affair With Hardik Pandya: टीम इंडियाचा (Team India) ऑलराऊंडर आणि आयपीएलमधल्या मुंबई इंडियन्स संघाचा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या बलताच चर्चेत आला आहे. बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेली अभिनेत्री ईशा गुप्ताही (Esha Gupta) आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हार्दिक पांड्या आणि ईशा गुप्ता (Isha Gupta) दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय. अशातच ईसा गुप्तानं यावर मौन सोडलं असून होय आम्ही जोन ते तीन वेळा भेटलोय आणि काही महिन्यांपर्यंत एकमेकांच्या संपर्कात होतो, असंही म्हटलं आहे. दरम्यान, अभिनेत्री ईशा गुप्तानं नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना अभिनेत्रीनं आपल्या फिल्मी करिअरसोबतच लव्ह लाईफपर्यंत अनेक बाबींवर भाष्य केलं.
हार्दिक पांड्यासोबतच्या डेटिंग रुमर्सबाबत काय म्हणाली ईशा गुप्ता?
बऱ्याच दिवसापासून अभिनेत्री ईशा गुप्ता आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच ईशा गुप्तानं मुलाखतीत बोलताना क्रिकेटरसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. 2018 मध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. जरी दोघे अखेर वेगळे झाले असले तरी, त्यांच्यातील अफेअरबद्दल अजूनही चर्चा होत आहेत. आता, सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये बोलताना ईशानं अखेर दोघं कधी रिलेशनशिपमध्ये होते, याचा खुलासा केला आहे.
ट्रेंडिंग
ईशा हार्दिक पांड्यालाही 2 वेळा भेटली
ईशा गुप्ता म्हणाली की, "हो, आम्ही काही काळ एकमेकांशी बोलत होतो. मला वाटत नाही की, आम्ही डेटिंग करत होतो, पण हो, आम्ही काही महिने बोलत होतो. मग आम्ही कदाचित ते होईल आणि ते होणार नाही, या विचारांच्या टप्प्यात होतो. पण, आमचं रिलेशन डेटिंगच्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वीच संपलं. म्हणजे ते डेटिंग-डेटिंग नव्हतंच. आम्ही एक-दोनदा भेटलो, एवढंच... तर हो, मी म्हटल्याप्रमाणे, ते काही महिन्यांसाठी होतं आणि नंतर ते संपलं."
ईशाला विचारण्यात आलं की, तुम्ही कपल बनू शकत होतात, त्यावर अभिनेत्री म्हणाली की, "कदाचित असं होऊ शकलं असतं. पण, मला वाटत नाही की, असं होऊ शकलं असतं. अफेअरच्या चर्चांना उधाण येण्यापूर्वीच आम्ही एकमेकांशी बोलणं बंद केलेलं."
महत्त्वाच्या इतर बातम्या :