Virat- Anushka Cricket teasing Video: आपल्या अतरंगी मजेनं बॉलिवूडमधलं विराट अनुष्काला ओळखलं जातं. नवराबायकोपेक्षा मित्रमैत्रिणीसारख्या केमिस्ट्रीनं चाहत्यांना नेहमीच या दोघांनी भुरळ पाडली आहे. सध्या सोशल मिडीयावर या दोघांचा मजेशीर व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. गल्ली क्रिकेटचे रुल्स वाचत अनुष्का विराटला क्रिकेटमध्ये आव्हान देताना दिसली. या व्हिडिओवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. विराट आणि अनुष्कानं त्यांच्या इंस्टाग्रॅम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.


तीन वेळा बॉल चुकला तर आऊट, तीन वेळा अंगाला बॉल लागला तर आऊट, ज्याची बॅट तो आधी बॅटिंग करणार असे गल्ली क्रिकेटचे नियम वाचून दाखवत अभिनेत्री अनुष्का शर्मानं विराटशी क्रिकेट खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर अनेकजण शेअर करत आहेत. 


आऊट झाल्यावर विराट चिडला...


अनुष्का विराटने पुमा इंडियासोबत पेड पार्टनरशिप करत आपल्या अधिकृत इंन्स्टाग्रॅम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात क्रिकेटच्या मैदानावर किंग असूनही बायकोपुढे विराटची दांडी गुल झाल्याचं दिसलं. यात अनुष्कानं गली क्रिकेटचे नियम वाचत विराटची मजा घेतल्याचं दिसलं. तिचं रुलबुक ऐकून विराटही चिडून मला खेळायचंच नाही असं म्हणत लटका रागवला. त्यावर राग आला तर आऊट असं म्हणत अनुष्कानं सगळ्यांनाच हसवलंय. 


पहिला बॉल ट्रायल, अनुष्काचे नियम संपेचनात


व्हिडिओ सुरु झाल्यापासून अनुष्का क्रिकेटकिंगला गली क्रिकेटचे नियम वाचून दाखवत असल्याचं दिसतं. ज्याची बॅट तो पहिल्यांदा बॅटिंग  करणार, पहिला बॉल ट्रायल, जो बॉल मारेल तोच आणेल असे नियम सांगत अनुष्कानं विराटला हैराण करून सोडलं.


 






नेटकऱ्यांच्या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रीया


नेटकऱ्यांनी विराट अनुष्काच्या या क्यूट व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रीया दिल्यात.. फर्स्ट बॉल ट्रायल बॉल हा जागतिक नियम असल्याचं एका चाहतीनं लिहीलंय तर सिनेमांपेक्षा जास्त तर हा व्हिडिओ आवडल्याचं एकानं लिहिलंय. एकानं विराटची अनुष्कासमोर दांडी गुल झाल्याचं पाहून लिहिलंय, 'देख रहे हो विनोद, पसंदिदा औरत के सामने किंग को भी झूकना पडता है'  असं लिहिलं आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून 5.5 मिलियन व्ह्यूज आणि 67.8 हजार कमेंटस या व्हिडियोला मिळाल्यात.