Entertainment News Live Updates 20 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 20 Mar 2023 07:31 PM
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय...More
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.Vanita Kharat : मराठी, हिंदीनंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातला आता टॉलिवूड खुणावतंय; म्हणाली...Vanita Kharat : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. वनिताने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता वनिताला दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करण्याची इच्छा आहे.Neha Pendse : नेहा पेंडसे आहे सहा मुलांची आई; नेमकं प्रकरण काय?Neha Pendse : मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम सिनेमांत काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे (Neha Pendse) या गुणी अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु नेहाची अशी एक गोष्ट आहे, जी तिच्या चाहत्यांना अजूनही माहीत नाही आणि ती गोष्ट म्हणजे नेहा सहा गोंडस मुलांची आई आहे. Prashant Damle : प्रशांत दामलेंच्या 'नियम व अटी लागू' नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसादPrashant Damle Niyam V Ati Lagu : माणूस हा असा प्राणी आहे की, सामान्यपणे तो कोणत्याही मानवी नियमांत बसत नाही. कालचा माणूस आज वेगळा भासतो. कोणत्या प्रसंगी आपण कसे वागू हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे सांगणे आणि स्वतः वागणे यात फरक पडतो. थोडक्यात काय तर नियम व अटींच्या (Niyam V Ati Lagu) बाबतीत विचाराच्या, वागण्याच्या बाबतीत ठामच असावे, असा हट्ट अनेकदा चुकीचा ठरतो. सोयीनुसार नियमातून पळवाट काढताना अटींचा भंग होऊ शकतो. हे माहीत असूनही नियम व अटी लागू केल्या जातात. त्यात जर या नियम व अटी नवरा व बायकोच्या नात्याला लागू करायच्या असतील तर काय?
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Kangana Ranaut : एलॉन मस्कच्या ट्वीटला कंगना रनौतचं उत्तर, जुन्या प्रेमप्रकरणावर केलं भाष्य
Kangana Ranaut : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तसेच आपल्या स्पष्टवक्ते शैलीमुळे ती चर्चेत असते. एखाद्या ज्वलंत प्रश्नासह प्रेमप्रकरणाबद्दलही ती भाष्य करते. अशातच आता पुन्हा एकदा तिने एलॉन मस्क (Elon Musk) यांचं ट्वीट रिट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.