Marathi Shortfilms: नावाला शॉर्टफिल्म, पण दिलाय मोठा संदेश; मराठीतील 'हे' जबरदस्त लघुपट एकदा पाहायलाच हवेत!

टीव्हीवरच्या त्याच रोजच्या मालिका पाहून कंटाळला असाल तर हे लघूपट तुम्हाला नक्की आवडतील. कुठे पहाल? जाणून घ्या..

Continues below advertisement

Marathi Shortfilms: आजकाल टीव्हीवरील रोजच्या मालिका पाहून 'कंटाळा आलाय बुवा' अशी प्रतिक्रीया  सहजपणे येते. मग दुसऱ्या कुठल्यातरी चॅनलवर चांगला सिनेमा लागलाय का याची चाचपणीही होते. पण पाहिलेलेच चित्रपट पुन्हा पाहण्यापेक्षा मराठीत हलक्या फुलक्या विषयांवर आधारलेल्या पण आशयघन मांडणी असलेले हे लघुपट (Marathi Shortfilms) तुम्हाला पाहता येतील. युट्यूबवर उपलब्ध असणाऱ्या या जबरदस्त शॉर्टफिल्म्स नवी कलाकृती पाहिल्याचं समाधान तर देतातच शिवाय दोन तीन तास वेळही जात नसल्यानं कामात असणाऱ्यांनाही छोटासा ब्रेक मिळतो.

Continues below advertisement

 1. चैत्र

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत असलेला 'चैत्र' हा लघूपट जीए कुलकर्णींच्या एका कथेवर आधारलेला आहे. या लघुपटाला पाच राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्येही या लघूपटानं प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. २००८ साली प्रदर्शित झालेल्या या शॉर्टफिल्ममध्ये चैत्रातल्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाभोवती या लघुपटाचं कथानक फिरतं. कडक उन्हाळ्यात पन्ह प्यायला मिळेल म्हणून आईच्या सोबत हळदीकुंकवाला जाणाऱ्या आपल्या मुलासमोर आणि चार बायकांमध्ये झालेल्या अपमानानंतर या कथानकाला वेगळंच वळण येतं. या लघुपटाला तुम्हाला युट्यूबवरही पाहता येईल.

 

2.केवडा

सई ललीतच्या या लेखीकेच्या कथेवर असणारा हा लघूपट तुम्हाला तुमच्या आजीची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही. आजीच्या घरी दर काही दिवसांनी चक्कर मारणारा आजच्या काळातला तरुण नातू आपल्या विश्वात रमलेला. त्याला नवंजूनं, तिच्या आयुष्यातलं सांगणारी आजी यांच्या नात्याची ही गोष्ट आहे. लहान असतानाच आपल्या देवाघरी गेलेल्या मुलाच्या आठवणींची पेटी उघडते आणि आजी त्या आठवणींत रमते. घरात एरवी कोणीच नसल्यानं तिच्या समोर बसलेल्या आणि त्याच्याच विश्वात असणाऱ्या नातवाला आठवणी सांगता सांगता  रडवेली होते. 

3.प्रदोष

सिदार्थ चांदेकर आणि मृण्मयी गोडबोले यांची प्रमुख भूमिका असणारा हा लघूपट तुम्हाला १९०५ च्या महाराष्ट्रात घेऊन जातो. जिथे लतिकाचं एका कुटुंबात लग्न होतं. नवविचारांची लाट असलेला तिचा नवरा लग्नानंतर काही आठवड्यातच निघून जातो. मुळातच दागदागिन्यांची, सौंदर्याची हौस असणाऱ्या आणि आता विधवा झालेल्या लतिकाला आलवण  घालण्यास सांगितले जाते. दरम्यान, संगीत नाटकातील स्त्रियांच्या भूमिका करणाऱ्या तिच्या दिराला तिच्या हक्काचा पोशाख घातलेला 'माणूस' पाहून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होतो पण प्रदोषादिवशी या नात्याला वेगळे वळण येते. हा लघूपट शेवटपर्यंत पाहणाऱ्यास खिळवून ठेवतो. विधवेच्या मनात येणाऱ्या प्रेमभावनांची खोली दाखवतो.

 

4कट्टी

या शॉर्टफिल्मच्या नावाप्रमाणंच दोन मैत्रिणींच्या लपाछपीच्या खेळापासून सुरु होणारी ही गोष्ट गावाकडच्या वाड्यात चित्रित करण्यात आले आहे. या मुलीसोबत खेळायचं नाही असं सांगणारी आई गावोगावी आजही दिसते. आपली आवडणारी मैत्रीणीला आईनं सांगितल्यानं अनफ्रेंड करणारी मीरा आणि तिच्या मैत्रीणीची ही कथा कशी पुढे जाते हे पाहण्यासारखी आहे.

 

हेही वाचा:

Dhoom 4 : धूम 4 चित्रपटामध्ये आमिर खान-ऋतिक रोशनला डच्चू, 'या' अभिनेत्याची निवड

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola