Diljeet dosanjh: जागतिक स्तरावर पोहोचलेला दिलजीत दोसांझ त्याच्या चाहत्यांसाठी नेहमी काही न काही  करताना दिसून येतो. त्याच्या पंजाबी खुलेपणाचं कौतूक कायम होत असतं. नुकत्याच मँचेस्टरमध्ये झालेल्या एका कॉन्सर्टदरम्यान त्यानं त्याच्या एका चाहतीला स्टेजवर बोलवत भेटवस्तू दिली. विशेष म्हणजे ही चाहती पाकिस्तानी असल्याचं कळल्यावर त्यानं हिंदुस्थानी असो किंवा पाकिस्थानी माझ्यासाठी सगळे सारखेच आहेत. पंजाब्यांचं सगळ्यांवर प्रेम असल्याचं म्हणत दिलजीतनं प्रेक्षकांची मनं जिंकली.. यावेळी या चाहतीला दिलजीतनं शुज गिफ्ट केले.


सरहद्द राजकारणी तयार करतात. पण पंजाबींना त्याची पर्वा नाही. पंजाबी सर्वांवर प्रेम करतात. त्याचं संगीत भारत पाकिस्तान विभाजनाच्या पलिकडचं असल्याचं त्यानं सूचवलं. सध्या सोशल मिडीयावर त्याच्या हा व्हिडीयो चांगलाच व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रीया उमटल्यात.


हात जोडून दिले चाहतीला शूज


या व्हिडीओमध्ये कैद झालेल्या एका हृदयस्पर्शी क्षणात दिलजीतनं हात जोडून एका महिला चाहतीला भेटवस्तू दिली. जेंव्हा ती कोणत्या देशाची आहे असं विचारल्यावर तिनं पाकिस्तानी असल्याचं सांगितलं. त्यावर त्यानं पंजाबीत उत्तर दिलं. तो म्हणाला, हिंदूस्थान असो वा पाकिस्तान, आमच्यासाठी दोन्ही एकच आहे. पंजाबींना सगळे आवडतात. सीमा राजकारण्यांनी तयार केल्या आहेत. पण माझ्यासाठी सर्व समानच आहेत. मी माझा देश आणि पाकिस्तानर या दोन्ही देशातील लोकांचे स्वागतच करतो. असं तो म्ळणाला. स्टेज सोडण्यापूर्वी त्यानं चाहत्यांचे आभार मानले. यावेळी त्याच्या कॉन्सर्टला आलेल्या त्याच्या चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 


 






आपल्या आई आणि बहिणीस भेटवले चाहत्यांना


दिलजीत दोसांझच्या मँचेस्टरमधील कॉन्सर्टमध्ये अजून एका गोष्टीनं साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. गर्दीतून जात असताना आपल्या आईचा हात धरत त्यानं सहजपणे ही माझी आई आणि माझी बहीणही इथे असल्याचं चाहत्यांना सांगितलं. यावेळी चाहत्यांनी जोरदार स्वागत केलं. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये हा सारा प्रकार झाला असून चाहत्यांनी त्याच्या गाण्यासह त्याच्या कुटुंबालाही भरभरून प्रतिसाद दिला आहे.


 






युके दौरा संपवून दिलजीत येणार भारतातील शहरांमध्ये..


दिलजीत दोसांझ 18 ऑक्टोबरला यूके दौरा संपवणार आहे आणि 26 ऑक्टोबरला दिल्लीत भारत दौरा सुरू करणार आहे. हा दौरा दिलजीतला हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, लखनौ, कोलकाता, बेंगळुरू, इंदूर आणि चंदीगडसह अनेक प्रमुख शहरांमध्ये घेऊन जाईल.


हेही वाचा:


अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी लागली, ICU मध्ये दाखल, तात्काळ शस्त्रक्रिया, सध्या प्रकृती कशी?