Jigra: चित्रपटगृहांमध्ये सपशेल आपटलेला आलिया भट्टचा नवा चित्रपट ओटीटीवर रिलिज होणार आहे.  या बॉलिवूड अभिनेत्री आलियाचा जिगरा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रदर्शित झालाय. या चित्रपटानं आतापर्यंत एकूण 23.35 कोटी रुपये कमावले असल्याचं सांगण्यात येत आहे. आपल्या भावासाठी दाखवण्यात येणारा जिगरा आता घराबसल्या पाहता येणार आहे. 


कधी पाहता येणार जिगरा ओटीटीवर?


जिगरा' हा चित्रपट नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला ओटीटीवर येणार असल्याचं सांगितलं जातंय. धर्मा प्रोडक्शन आणि  इटर्नल सनशाईन प्रोडक्शन यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आलियानं या चित्रपटात सत्याची भूमिका साकारली आहे. तर वेदांग रैनाने अंकुरची भूमिका साकारली आहे.  आलिया या चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. भरपूर ॲक्शन आणि थ्रीलर या चित्रपटात दिसतोय. 


कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार जिगरा?


मीडिया रिपोर्टनुसार, जिगरा या चित्रपटाचे स्ट्रिमिंग अधिकार नेटफ्लिक्सनं घेतले आहेत. बॉक्स ऑफिसवर सध्या या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसला तरी कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबर  महिन्यात हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दिसणार आहे. दरम्यान या चित्रपटाची चर्चा सुरुवातीपासून आहे. चित्रपट रिलिज झाल्यानंतर एका अभिनेत्रीनं केलेल्या इंट्राग्रॅम स्टोरीमुळेही काहीसा वादग्रस्त प्रसंग झाला होता.


जिगराच्या फेक बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिव्या खोसलाचा संताप


आलिया भट्टचा जिगरा हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. नुकतेच कंगना रणौतने आलिया भट्टला चित्रपटाच्या थंड ओपनिंगबद्दल अप्रत्यक्ष टोला लगावलाआणि आता दिव्या खोसलाने एका पोस्टद्वारे थेट आलिया भटवर निशाणा साधला आहे. दिव्याने जिगरा चित्रटाच्या कलेक्शनचे आकडे बनावट असल्याचं म्हटलं आहे. आलिया आणि दिव्याच्या वादात आता करण जोहरने उडी घेतली आहे. दिव्या खोसला हिने 'जिगरा' चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 'जिगरा' चित्रपट पाहिल्यानंतर दिव्याने संताप व्यक्त केला आहे.


दिव्याच्या पोस्टवर करण जोहरची प्रतिक्रिया


दिव्या खोसलाच्या या पोस्टनंतर, करण जोहरने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी अभिनेत्री दिव्यासाठी असल्याचं बोललं जात आहे. जिगरा चित्रपटाचा निर्माता करण जोहरने लिहिलंय, "मूर्खाला उत्तर देण्यासाठी मौन हा सर्वोत्तम पर्याय आहे."


हेही वाचा:


Jigra Movie Review : जिगरा : पूर्णपणे फसलेला चित्रपट