Bigg Boss 17: सध्या कलर्स टीव्हीवर बिग बॉसचे 18 वे पर्व सुरू असून या शोविषयी प्रेक्षकांना मोठे कुतूहल आहे. बिग बॉसचा प्रत्येक सीझन अगदी दणदणीत वाजल्याचं दिसून येतं. त्यातील कलाकारांविषयीही प्रेक्षकांना उत्सुकता असते.  दरम्यान बिग बॉसच्या 17 व्या (Bigg Boss 17) पर्वातील सना रईस खानने केलेल्या एका धक्कादायक खुलाशाची जोरदार चर्चा सुरू आहे. बिग बॉस 17 चा घरात आपल्या राहणीमानाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री सना रईस खान (Sana Rais Khan) हिला एका खटल्यात जीवे मारण्याचा धमक्या मिळाल्याचं तिने नुकतेच सांगितले आहे. 


प्रसिद्ध वकील आणि पुढे बिग बॉसमधून रियालिटी शो स्टार झालेली सना रईस खान ही अनेक खळबळ जनक वादग्रस्त व हायप्रोफाईल केसेसासाठी ओळखली जाते. बिग बॉसच्या 17 व्या सीजनमधून लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीने नुकताच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातल्या गोष्टींचा समतोल ती कसा राखते याबद्दल बोलताना हा खुलासा केलाय.


काय म्हणाली सना रईस खान?


सना खान म्हणाली, मी निकड आणि महत्व यावर लक्ष केंद्रित केले आहे. गंभीर बाबी वेळेवर पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगते एक वकील म्हणून मी सामाजिक न्यायासाठी योगदान देते पण या व्यवसायात मला जीवे मारण्याच्या धमक्यांचा सामना करावा लागला आहे. त्यात हरियाणा एन्काऊंटर प्रकरणाचा समावेश आहे. ज्यामुळे माझ्या मनशांती वरही परिणाम झाला असल्याचं सना खान म्हणाली. 


माझ्या व्यवसायातील जोखीम मोठी 


माझ्या व्यवसायात उच्च जोखमीचा समावेश आहे. मी मोठ्या प्रमाणात सामाजिक न्यायासाठी योगदान देते जिथे लोकांचे जीव धोक्यात आहेत. हरियाणा एन्काऊंटर खटल्यात दिव्या पाहूद्यासाठी लढताना मला जीवे मारण्याचा धमक्या मिळाल्या आणि मी तिला जामीन मिळवून दिल्यानंतर तिची दुःखद हत्या झाली. या घटनेने माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. मनशांती वर परिणाम झाला. कालांतराने मला ही गोष्ट समजली. असं सना खान म्हणाली.


कोणत्या केसेस वर काम केलंय सना खानने? 


बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्या कथित अमली पदार्थांच्या अटकेच्या प्रकरणात नेमणूक करण्यात आलेल्या वकिलांपैकी सना एक होती. ती व्यवसायाने क्राईम संबंधातील खटले चालवणारी वकील आहे. आर्यन खानच्या केसमध्ये तिने आर्यनचा मित्र अविन साहू याचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच कुख्यात शिना बोरा हत्याकांडात इंद्राणी मुखर्जीची वकील म्हणूनही सनाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. इंद्राणी ला तिची मुलगी शीना बोराहीच्या हत्याप्रकरणी प्राथमिक आरोपी म्हणून मुंबई पोलिसांनी अटक केली होती.