सलमान खान होस्ट असलेला बिग बॉस 18 च्या नवीन पर्वाची सुरुवात झाली असून दोनच दिवसात बिग बॉसच्या घरात स्पर्धक आमने-सामने येत आहेत. दुसऱ्या दिवशीच स्पर्धकांमध्ये वादविवाद होत असताना आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्तेंच्या मिश्किल स्वभावाचं दर्शन झालंय. घरात हास्यविनोद करत शेरेबाजी करणाऱ्या सदावर त्यांचा आगळवेगळे रूप पाहून घरासह प्रेक्षकांमध्येही हशा पिकला आहे.
सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची केस लढवणारे गुणरत्न सदावर्ते थेट बिग बॉसच्या घरात गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांच्या खेळाकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष असून कलर्स टीव्ही आणि बिग बॉस ने शेअर केलेल्या व्हिडिओतून त्यांची खरपूस शेरेबाजी चर्चेचा विषय ठरली आहे.
सिरीयस वकील गेला फन मोडमध्ये
सिरीयस वकील अशी ओळख असणारे वकील गुणरत्न सदावर्ते एकदम विनोदी भूमिकेत गेल्याचं पाहून घरातील स्पर्धकही हास्यकल्लोळात सामील झाले होते. बग्गाजी, हेमाजी म्हणत त्यांचा घरातील सहज वावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. कलर्स टीव्ही आाणि बिगबॉसच्या अधिकृत पेजवरून सदावर्तेंचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रीया दिल्या असून सदावर्तेंचा व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरलाय. या व्हिडिओवर फनी व्हिडिओ, ये बंदा सबसे अलग है असं लिहित सदावर्तेंचं कौतूक केलं आहे. यावर कलर्सने जर हसायचं असेल तर सर्वात चांगला इलाज, डॉ गुणरत्न यांची मिश्कील शेरेबाजी हास्याचा बेपर्वा राग असल्याचं लिहिलं आहे.
बिग बॉसच्या टास्कला सुरुवात
बिग बॉसचे नवनवीन टास्क आता सुरू झाले आहेत. यात ग्रँड प्रीमियर च्या दिवशी बिग बॉस ने चाहत पांडे यांना एक टास्क दिला होता. ज्यामध्ये जर कोणत्याही दोन सदस्यांना त्यांनी जेलमध्ये जाण्यासाठी तयार केलं तर ते जेलमध्ये जाण्यापासून वाचू शकतात असा टास्क होता. यानंतर तेजिंदर पाल सिंग बग्गा हे स्वतः जेलमध्ये जाण्यासाठी तयार झाले. त्यांनी हेमा शर्मालाही जेलमध्ये जाण्यासाठी तयार केले. दरम्यान सदावर्तेंच्या मिश्किल शेरेबाजीने घरातील वातावरण हलकेफुलके झाले होते.
हेही वाचा: