Big Boss 18: बिग बॉस 18 सध्या प्रेक्षकांच्या औत्सुक्याला विषय ठरला असून पहिला आठवड्यातच स्पर्धकांनी आमने-सामने येत घरात धुमाकूळ घातलाय. बिग बॉसने दिलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये अनेकांनी एकमेकांवर चिखलफेक केलाच दिसतंय. यानंतर बिग बॉसच्या घरातील 5 स्पर्धक नॉमिनेट झाले असून पहिल्या नॉमिनेशन टास्कमध्येच या शोला छप्परफाड टीआरपी मिळतोय.
दरम्यान पहिल्या नॉमिनेशन टास्कमध्ये वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांचा दिलखेचक अंदाज पाहायला मिळाला. बग्गाजी , हेमाजी म्हणत त्यांच्या विनोदी स्वभावाने बिग बॉसच्या घरात त्यांचा सहज वावर प्रेक्षकांना भावला . तर दुसरीकडं खंडाळ्यात एन्काऊंटर ,दाऊदचा फोन असे वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेचा विषयही ठरले .
बिग बॉसच्या पहिला नॉमिनेशन टास्कमध्ये झालं काय ?
बिग बॉस 18 चा पहिला आठवडा प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय ठरतोय . पहिल्या आठवड्यातच बिग बॉसने घरातील स्पर्धकांना गार्डन एरियामध्ये बोलावले जिथे सर्व स्पर्धकांना या शो मधून घराबाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी नॉमिनेट करायचे होते . नॉमिनेट केल्यानंतर त्या स्पर्धकाला का नॉमिनेट केले हेही सांगायचं होतं . यावेळी गुणरत्न सदावर त्यांना या स्पर्धेला तुम्ही घाबरत तर नाही ना असे विचारण्यात आले . तेव्हा बिग बॉस कालही आम्ही तेच होतो आज आणि उद्याही आम्ही तेच राहू . आमच्या डोक्यात आणि विचारात कधीही भीती डोकावली नाही . डर के आगे जीत होती है ! असं उत्तर त्यांनी बिग बॉसला दिलं .
गुणरत्न सदावर्ते का झाले नॉमिनेट ?
नॉमिनेशन टास्कच्या दरम्यान सर्वात आधी घरातील सदस्यांनी चाहत पांडे यांचे नाव घेतले .यावेळी गुणरत्न सदावर्तनी त्यांना नॉमिनेट करत असे सांगितले चाहत यांच्यामध्ये रियालिटी खूप कमी आहे . ढोंगी पणाने व्यक्त होतात . त्यामुळे त्यांना नॉमिनेट करायला हवं . पण घरातील सदस्यांनी जेव्हा गुणरत्न सदावर्तेंच्या नाव घेतलं तेव्हा त्यांच्या आरोपांनाही गुणरत्न सदावर्तेंनी चोख उत्तर दिलं .करणविरने केलेल्या आरोपांवर सडेतोड उत्तर देत सदावर्तेंनी करणवीर ला आरसा दाखवला .
<
काय म्हणाला होता करणवीर ?
करणवीर ने गुणरत्न सदावर्तेंना नॉमिनेट करत असे म्हटले ,त्यांना असं वाटतं की एडवोकेट गेममध्ये नाहीत . ते केवळ पडून राहतात किंवा झोपतात . जेव्हा बिग बॉस ने सर्व स्पर्धकांना विचारले की कोणा कोणाला हा शो जिंकायचा आहे ,तेव्हा कदाचित त्यांनी हातही उचलला नाही . त्यांना बहुदा वेगळाच कॉन्फिडन्स आहे . "
सदावर्तेंनी दाखवला करणविरला आरसा
यावर सदावर्तेंनी करणवीरला सडेतोड उत्तर दिलंय . ते म्हणाले करणवीर सिनेमांसाठी बनला असेल तर आम्ही फिल्ड साठी बनलो आहोत . कदाचित त्यामुळेच या दुनियेत करणवीर सोबत खूप कमी दिवस राहण्याची ही संधी असेल .जिंकण्यासाठी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी मी या शोमध्ये आलो नाही . असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले .