Must Watch Indian Shortfilm : तुम्हालाही भारतातील सर्वोत्तम शॉर्ट फिल्म पाहायला आवडतात का? आवडत असतील तर हिंदीतील हे लघुपट तुम्ही पाहायलाच हवेत असे आहेत. कमीत कमी वेळेत अधिक आशयघन मांडणी करणाऱ्या या पाच शॉर्टफिल्म नवीन कलाकृती पाहिल्याचा आनंद देणाऱ्या आहेत. शिवाय शंभर कोटी रुपयांचा ब्लॉकबस्टरपेक्षाही उजव्या ठरणाऱ्या या लघुकथा 'मस्ट वॉच'मध्ये गणल्या जातात. कोणत्या आहेत या शॉर्ट फिल्म? पाहूयात..


1) ज्यूस (juice)


शेफाली शहाचा दमदार अभिनय आणि सर्वसामान्य भारतीय घरांमधलं स्त्रीचे चित्रण दाखवण्यात आलेली ही शॉर्ट फिल्म अनेकांना आवडणारी आहे. मित्रांसोबत हॉलमध्ये आरामात बसलेल्या ऑर्डरी सोडणाऱ्या नवऱ्याच्या मित्रांसाठी स्वयंपाक घरात काम करणाऱ्या मध्यमवर्ग गृहिणीवर चित्रीत करणात आलेली ही शॉर्ट फिल्म अनेकांच्या मनाचा ठाव घेते. कोणत्याही लाऊड प्रतिक्रियेशिवाय आणि काहीतरी शिकवायला जाण्याच्या अविर्भावात न गेलेली ही शॉर्टफिल्म तिच्या मुख हालचालींमधून अधिक ताकदवान झाली आहे. मिरज ज्ञानवान यांनी लिहिलेली व दिग्दर्शित केलेली ही शॉर्ट फिल्म युट्युब वरही उपलब्ध आहे .



2 ) खुजली (khujali)


भारतीय हिंदी लघुपटांपैकी सर्वोत्कृष्ट समजले जाणारी खुजली ही शॉर्ट फिल्म एक मजेशीर लघुपट आहे . एका पन्नाशीच्या पुढच्या जोडप्यावर आधारित असणारा हा लघुपट अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा आहे . एक वृद्ध जोडपं 50 शेड्स ऑफ ग्रे या चित्रपटापासून प्रेरित होतं आणि त्यांना सेक्सचा पुर्नशोध होतो. जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता या प्रतिभावान स्टारकास्ट असणारा हा लघुपट मध्यमवयीन जोडप्यांच्या शारीरिक जवळीकतेच्या अस्पष्टतेभोवती गुंफलेला आहे . जिओ फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये ही या लघुपटाला पुरस्कार मिळाला असून सोनमनेर या लेखक व दिग्दर्शकाचा हा लघुपट आहे . 



 


3) जय मातादी (Jay Mata Di) 


टेरेली टेनी टेल्स साजाई मातादी हा सर्वोत्तम लघुपटांपैकी असणाराच एक मजेशीर आणि अनेक ट्विस्टने भरलेली शॉर्ट फिल्म आहे . श्रेया पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर यांची मायलेकीची जोडी असणारा हा लघुपट एका अविवाहित जोडप्यावर चित्रित करण्यात आला आहे . लिव्ह इन रिलेशनशिप या कन्सेप्ट वर आधारित असणारा हा चित्रपट आऊट ऑफ द बॉक्स सोल्युशन डेट प्रेक्षकांना खेळवून ठेवतो . काहीशी मजेदार आणि आश्चर्याने भरलेली ही शॉर्ट फिल्म आनंद देणारी आहे . 



 4) खाने मे क्या है (khane mein kya hai)


प्रत्येकाचा त्याच्या आईसोबत लैंगिक संभाषणावर आधारित असणारा एक क्षण असतोच . या लघुपटात स्वयंपाक करताना आईचा आणि मुलीचा हृदयस्पर्शी आणि मजेदार संवाद  पाहायला मिळतो . शिखा तलसानिया आयेशा मिश्रा यांची प्रमुख भूमिका असणारा हा लघुपट मोठा गमतीशीर बनवण्यात आला आहे . ब्लश अँड छोटी प्रोडक्शन कंपनीची ही शॉर्ट फिल्म युट्युब वरही उपलब्ध आहे . 


 



5) चटणी (chutney)


एक अतिशय मनोरंजक आणि आश्चर्याचा धक्का देणारी एक आगळीवेगळी शॉर्ट फिल्म म्हणून चटणी हा लघुपट ओळखला जातो . अनेक ट्विस्ट आणि टर्न भरलेली ही शॉर्ट फिल्म शेवटी अगदी सहजपणे एका भयानक रहस्यकडे वळते .थोडीशी थ्रिलर थोडीशी गुढ आणि अस्वस्थ करणाऱ्या सत्याकडे घेऊन जाणारी चटणी ही शॉर्ट फिल्म न चुकवण्यासारखीच आहे .