Elvish Yadav Viral Video :   'बिग बॉस ओटीटी-2' चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) पुन्हा एकदा चर्चेत  आला आहे. एल्विश यादवचा (Elvish Yadav Viral Video) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका रेस्टॉरंटमध्ये एल्विशने एका व्यक्तीच्या कानाखाली मारली आणि राडा केला. जयपूरमधील एका रेस्टोरंटमध्ये ही घटना घडली असल्याची माहिती आहे. आपल्याला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, हे मुळीच सहन करणार नसल्याचे एल्विशने म्हटले. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली.


जयपूरमधील एका हाय-प्रोफाइल रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली. ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या व्हायरल व्हिडिओनुसार, 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' चा विजेता एल्विश यादव एका माणसाला कानाखाली मारताना दिसत आहे. ही व्यक्ती नेमकी कोण होती, याबाबत माहिती समोर आली नाही. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली. एल्विश यादव यांच्या पीआर टीमने या घडामोडीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण एल्विशच्या वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.






एल्विशने काय म्हटले?


व्हायरल होणाऱ्या क्लिपमध्ये एल्विश यादव बोलताना दिसत आहे. यामध्ये एकाला तो म्हणतोय की, मला हाणामारी, भांडण करण्याचा कोणताही शौक नाही .  मला माझ्या कामाशी अर्थ आहे. ज्याला फोटो काढायचा आहे, त्यांच्यासोबत कोणतीही तक्रार न करता फोटो काढतो. माझ्यासोबत  पोलीस, कमांडो आहेत. काही चुकीचे वागलो का हेच ते सांगतील असेही एल्विशने म्हटले. पण, जर मला कोणी आई-बहिणीवरून शिविगाळ केल्यास तर मी त्यांना सोडणार नाही, असेही एल्विशने म्हटले. मी अशा लोकांना तोंडाने उत्तर देत नसल्याचे एल्विश यादवने म्हटले. 






 


एल्विश यादव कोण आहे? (Who Is Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav)


एल्विश यादव हा एक लोकप्रिय युट्यूबर आहे. युट्यूबच्या माध्यमातून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. 25 वर्षीय एल्विश हा मुळचा गुरुग्रामचा राहणारा आहे. दिल्लीतील हंसराज महाविद्यालयातून त्याने शिक्षण घेतलं आहे. 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये धमाकेदार वाइल्ड कार्ड एन्ट्री करत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एल्विश युट्यूबवर अॅक्टिव्ह असण्यासोबत शॉर्ट फिल्म्सदेखील बनवतो. 'एल्विश यादव व्लॉग्स' असे त्याच्या चॅनलचे नाव आहे. एल्विशला महागड्या, आलिशान गाड्यांची आवड आहे. 


बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व 17 जून 2023 रोजी सुरू झालं होतं. पुनीत सुपरस्टार, पूजा भट्ट, मनीषा रानी, बेबिका धुर्वे, साइरस ब्रोचा, अभिषेक मल्हान, आलिया सिद्दीकी, फलक नाज, अविनाश सचदेव, जद हदीद, जिया शंकर, आकांक्षा पुरी आणि पलक पुरसवानी हे स्पर्धक 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये सहभागी झाले होते.