Mohanlal Drishyam 3: मोहनलाल (Mohanlal) अभिनीत 'दृश्यम 3'चा (Drishyam 3) बॉक्स ऑफिसवर (Box Office) बोलबाला सुरू आहे. या सस्पेन्स थ्रिलर सिनेमानं बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत. मोहनलालने पुन्हा एकदा जॉर्जकुट्टीच्या भूमिकेत पुनरागमन केले आहे. त्यानं तिसऱ्या भागातूनही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा सिनेमा 21 मे 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज झाला. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दरम्यान, 'दृश्यम 3'नं 11 व्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या रविवारी किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
'दृश्यम 3' सिनेमानं रविवारी उत्तम कामगिरी केली (Drishyam 3 Box Office Collection)
मोहनलालचा सिनेमा 'दृश्यम 3' नं बॉक्स ऑफिसवर आपली घौडदौड कायम ठेवली आहे. सस्पेन्स थ्रिलर या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमानं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. ज्यामुळे हा सिनेमा या वर्षातील सर्वात मोठा मल्याळम ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी एक बनण्याच्या मार्गावर आहे.
या सिनेमाबाबत बोलायचं झाल्यास, 'दृश्यम 3'नं प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात 81.95 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. नवव्या दिवशी या सिनेमानं 4.30 कोटी रुपये कमावले. तर, दहाव्या दिवशी या सिनेमानं 5.10 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 'दृश्यम 3'नं प्रदर्शनाच्या 11 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी 5.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, या सिनेमाची 11 दिवसांतील एकूण कमाई आता 96.70 कोटी रुपये झाली आहे.
वर्ल्डवाइड 'दृश्यम 3' सिनेमाची घौडदौड (Mohanlal Drishyam 3 Sunday earnings)
भारतासह या सिनेमाला परदेशातही प्रेक्षकवर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमानं परदेशात एकूण 113.75 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. वर्ल्डलाइड या सिनेमानं एकूण 225.95 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईत आणखी वाढ होईल, यात शंका नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'देऊळ बंद 2'च्या स्पर्धेत 'राजा शिवाजी' ठाम, 31व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन झाले?
ABP माझाच्या बातम्या LIVE...
