Drishyam 3 latest Bollywood box office: पहिल्या आठवड्यात दमदार ओपनिंग केल्यानंतर 'दृश्यम 3' (Drishyam 3) या सिनेमाची घौडदौड कायम आहे. विकेंडला केलेल्या जबरदस्त बॉक्स ऑफिस कलेक्शननंतर 'दृश्यम 3' आता विकडेजमध्येही कमाई करत आहे. विकडेजमध्येही सिनेमागृहात (Entertainment) प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. भारतीय सिनेसृष्टीत (Box Office Collection) या सिनेमाला नक्कीच मोठे यश मिळेल. 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' या सिनेमांना मिळालेल्या यशानंतर आता 'दृश्यम 3' देखील बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. मंगळवारी या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. मात्र, आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. दरम्यान, बुधवारी म्हणजेच 7व्या दिवशी या सिनेमाने किती कोटींचा गल्ला जमवला? पाहूयात.
'दृश्यम 3'ने सिनेमा रिलीजच्या सातव्या दिवशी किती कोटींची कमाई केली? (Drishyam 3 7th Day Box Office Collection)
बहुप्रतिक्षित 'दृश्यम 3' या सिनेमाला रिलीज होताच प्रेक्षकवर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. सिनेमागृहात रिलीज झाल्यानंतर क्राइम थ्रिलर 'दृश्यम 3'ला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. ओपनिंग विकेंडला या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळाली. नॉन हॉलिडेजमध्येही हा सिनेमा उत्तम कामगिरी करत आहे. विशेष म्हणजे, सिनेमागृहांमध्ये अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट असूनही 'दृश्यम 3' हा प्रेक्षकांची पहिली पसंती राहिली आहे.
सिनेमाच्या कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास, 'दृश्यम 3' या सिनेमानं 15.85 कोटीचं कलेक्शन करुन बॉक्स ऑफिसवर आपलं खातं खोललं. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 11.05 कोटींचे कलेक्शन केले. तर, तिसऱ्या दिवशी या सिनेमानं 13.70 कोटींचे कलेक्शन केले. दरम्यान, चौथ्या दिवशी या सिनेमानं 13.85 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.
'दृश्यम 3' या सिनेमानं सातव्या दिवशी किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले? (Drishyam 3 Earns 6.65 Crore on Day 7)
पाचव्या दिवशीही 'दृश्यम 3' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड पाहायला मिळाली. पाचव्या दिवशी या सिनेमाने 7.70 कोटींचे कलेक्शन केले. तसेच सहाव्या दिवशी या सिनेमानं 6.50 कोटी रुपयांची कमाई केली. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 'दृश्यम 3' ने रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच बुधवारी 6.65 कोटींचे कलेक्शन केले आहे. म्हणजेच या सिनेमानं आतापर्यंत एकूण 7 दिवसांत 75.30 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'राजा शिवाजी' सिनेमासाठी रितेश देशमुखचा थेट CM फडणवीसांना फोन; अडचण सांगताच एका रात्रीत केली मदत
ABP माझाच्या बातम्या LIVE...
