Riteish Deshmukh Raja Shivaji Movie Story: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या शौर्य गाथेवर आधारीत 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. 1 मे रोजी रिलीज झालेल्या ऐतिहासिक सिनेमात तगड्या स्टारकास्टची मांदियाळी पाहायला मिळाली. अवघ्या काही दिवसात या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) या सिनेमासाठी खास मेहनत घेतली. या सिनेमासाठी त्यानं तब्बल 10 वर्षे मेहनत घेतली होती.  अहोरात्र काम करुन हा सिनेमा साकारला.  नुकताच 'झी 24 तास महाराष्ट्र पुरस्कार' सोहळा पार पडला. या सोहळ्यादरम्यान, रितेश देशमुखनं चित्रपट निर्मितीदरम्यानचा एक अत्यंत खास  किस्सा शेअर केला.  तसेच व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले. 

Continues below advertisement

पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रितेश देशमुखचा सत्कार केला. यावेळी रितेश देशमुखनं 'राजा शिवाजी' सिनेमासंबंधित एक किस्सा शेअर केला. 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत 'राजा शिवाजी' हा सिनेमा जेव्हा मी करत होतो.  तेव्हा एक सेट उभारण्यासाठी आम्हाला जागा मिळत नव्हती.  आम्ही खूप प्रयत्न केले. परंतु, सेट उभारण्यासाठी जागा कुठेच मिळत नव्हती'.

'राजा शिवाजी' सिनेमासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी मदत (Devendra Fadnavis Helped Raja Shivaji Set)

 

Continues below advertisement

'एक जागा होती. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. मी त्यांना फोन करुन ती जागा सरकारी जागा आहे, असं सांगितलं. ती जागा ज्या दराने हिंदी सिनेमाला मिळते, ते दर आम्हाला परवडणारे नव्हते.  तेव्हा मुख्यमंत्री साहेब मला म्हणाले की, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा तयार करत आहात. ती  जागा तुम्हाला उद्या सकाळपर्यंत उपलब्ध असेल', असं म्हणत रितेश देशमुखने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. 

'राजा शिवाजी' सिनेमाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत.  वर्ल्डवाइड 120 कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 26 दिवस उलटले आहेत. 26 व्या दिवशीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत उलगडणार इतिहासातील सर्वात मोठी क्रांती, नेमकं घडणार काय?

ABP माझाच्या बातम्या LIVE...