Drishyam 2 Clash With Bhoot Bangla: गेल्या काही दिवसांपासून 'दृश्यम 3' (Drishyam 3) बाबत बरीच चर्चा सुरू आहे. या सिनेमाची रिलीज डेट अवघ्या काही दिवसांपूर्वीच पुढे ढकलण्यात आली होती. मोहनलाल (Mohanlal) यांची प्रमुख भूमिका असलेला हा तेलुगू सिनेमा मूळतः एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता तो मे महिन्यात थिएटर्समध्ये प्रदर्शित होईल. मात्र, या घडामोडींच्या दरम्यानच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. याच फ्रँचायझीमधील आणखी एक सिनेमा लवकरच थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळतेय.
'दृश्यम 2'ला थिएटर्समध्ये रिलीज होणार (Drishyam 2 Theatrical Release)
मोहनलाल यांचा 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा सिनेमा, जो 2021 मध्ये ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता, आता लवकरच थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. कोविड-19 महामारीमुळे हा सिनेमा मूळतः एका OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता, जिथे त्याला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम आणि पसंती मिळालेली. आता या सिनेमाला थिएटर्समध्येही प्रदर्शित होण्याची संधी मिळाली आहे, 10 एप्रिल रोजी हा सिनेमा थिएटर्सच्या पडद्यावर झळकणार आहे.
अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'शी कॅल्श (Drishyam 2 vs Bhoot Bangla)
मोहनलाल यांचा 'दृश्यम 2' आणि अक्षय कुमारचा 'भूत बंगला' यांच्यात तगडा क्लॅश पाहायला मिळणार आहे. दरम्यान, दोन्ही फिल्म वेगवेगळ्या जॉनरच्या आहेत. जिथे 'भूत बंगला' हॉरर कॉमेडी फिल्म आहे, तर 'दृश्यम 2' एक सस्पेंस क्राइम थ्रिलर फिल्म आहे. आता या दोन सिनेमांपैकी कोणत्या सिनेमाला प्रेक्षकांचं अधिक प्रेम मिळतं, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.
'दृश्यम 3'बाबतची उत्सुकता शिगेला (Drishyam 3 Release Date)
चाहते 'दृश्यम 3' च्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहेत. मूळ 'दृश्यम' हा सिनेमा थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता आणि तिथे त्याला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालेलं. मात्र, कोविड-19 महामारीमुळे 'दृश्यम 2' हा सिनेमा एका ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. असं असूनही, या सिनेमाला ओटीटी प्लॅटफॉर्मवरही भरभरून प्रेम मिळालं. परिणामी, प्रेक्षक आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची (इन्स्टॉलमेंटची) आतुरतेनं वाट पाहत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, हा सिनेमा 21 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात मोहनलाल पुन्हा एकदा 'जॉर्ज कुट्टी' ही आपली भूमिका साकारताना दिसतील, तर मीना, अंसिबा हसन आणि एस्थर अनिल या देखील यात महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
