Web Series On Sukesh Chandrashekhar: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) जॅकनिल फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि 'महाठग' म्हणून नावारुपाला आलेला सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) यांच्या रिलेशनशिपच्या (Relationship) चर्चा 2021 पासून चर्चेत आहेत. 200 कोटी रुपयांची खंडणी (Ransom) आणि मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात सध्या सुकेश चंद्रशेखर तुरुंगात (Sukesh Chandrasekhar in Jail) आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुकेश चंद्रशेखरनं (Documentry On Sukesh Chandrashekhar) त्याच्या काळ्या पेशातून जॅकलीनला कोट्यवधी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू (Expensive Gifts) दिल्याचं समोर आलं होतं. पण, अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, याप्रकरणी तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे. अशातच आता याप्रकरणावर एक वेब सीरिज (Web Series) बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. हा एक डॉक्यु-ड्रामा (Docu-Drama) असेल अशी माहिती मिळत आहे.
तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर डॉक्युमेंट्री (Documentary On Sukesh Chandrashekhar) बनवण्यात येणार असून त्यासाठी निर्मात्यांनी जॅकलीनशीच संपर्क साधल्याची माहिती मिळत आहे. जॅकलीननं याप्रकरणी आपली बाजू मांडावी आणि जे खरं घडलं ते सांगावं, अशी विनंतीही निर्मात्यांनी जॅकलीनला केल्याची माहिती मिळत आहे.
'मिड-डे'नं दिलेल्या वृत्तानुसार, एक आघाडीचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुकेश चंद्रशेखर याच्यावर ही डॉक्युमेंटरी-सीरिज (Documentary-Series) बनवत आहे. या सीरिजमध्ये, सुकेशच्या कथित लॉटरी घोटाळ्यापासून ते जॅकलीनला दिलेल्या लक्झरी भेटवस्तू आणि खंडणीपर्यंतच्या सर्व आरोपांमागील सत्य शोधण्याचा प्रयत्न केला जाईल.
जॅकलिनने निर्मात्यांकडून वेळ मागितला
निर्मात्यांनी या संदर्भात जॅकलिनशीही संपर्क साधल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "जॅकलिन एकमेव स्टार आहे, जी खरोखर काय घडलं, याबद्दल थेट बोलू शकते. ती जे सत्य सांगू शकते, त्यातून या प्रकरणातील अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. दरम्यान, असंही म्हटलं जातंय की, जॅकलिननं या ऑफरबद्दल विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे."
सायकोलॉजिकल-थ्रिलर आणि सोशल केस स्टडी बनवण्याचा प्रयत्न
जॅकलिन फर्नांडिसला तिच्या जवळच्या मैत्रिणींनी या डॉक्युमेंटरी सीरिजबद्दल सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कारण हे संपूर्ण प्रकरण कसं सादर केलं जाईल, हे अद्याप माहीत नाही. याशिवाय, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि निर्मात्यांच्या टीमनं एक रिसर्च टीम तयार केली आहे, जी डॉक्यु-सिरीजसाठी काही पुरावे गोळा करण्याचं काम करणार आहे. एक सायकॉलॉजिकल थ्रिलर आणि सोशल केस स्टडी एकत्रितपणे बनवत असल्याची माहिती आहे.
2026 मध्ये शूटिंग सुरू होणार
रिपोर्ट्सनुसार, त्यांची योजना सुकेशच्या कोर्टरूम ड्रामाला त्याच्या कथित पद्धतींशी जोडण्याची आहे, जसं की वायरटॅपिंग, लाचखोरी आणि संशयास्पद रिअल इस्टेट व्यवहार. या वर्षाच्या अखेरीस रिसर्च पूर्ण करण्याची आणि कथेवर काम सुरू करण्याची निर्माते योजना आखत आहेत. त्याचं चित्रीकरण 2026 च्या उत्तरार्धात सुरू होईल. तसेच, या डॉक्यु-ड्रामासाठी लीगल टीम सर्व परवानग्या घेत आहे. त्यामुळे वकिलांचं एक पथक यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, सुकेश चंद्रशेखर यानं तुरुंगातून आणखी एक पत्र लिहिलं आहे. त्यानं अलीकडेच 6 एप्रिल रोजी जॅकलिन फर्नांडिसची आई किम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सुकेशनं आपल्या पत्रात जॅकलिनची दिवंगत आई किम फर्नांडिस यांच्या आवडत्या फुलांनी भरलेली बाग भेट देण्याबद्दल सांगितलं आहे. सुकेशनं म्हटलं आहे की, तो जॅकलीनची आई किमला श्रद्धांजली म्हणून बालीमधली एक बाग समर्पित करणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :