Divya Shinde On Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) सहावा सीझन सध्या जोरदार चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात दाखल झालेल्या स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. अशातच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिव्या शिंदेची (Divya Shinde) बिग बॉसच्या घरातून हाकालपट्टी करण्यात आली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या दिव्या शिंदेनं नुकतीच एक पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. तसेच, अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यासोबतच दिव्या शिंदेनं बिग बॉस मराठीच्या टीमवरही गंभीर आरोपही केले आहेत.  

Continues below advertisement

'बिग बॉस मराठी'च्या टीमच्या हलगर्जीपणाबाबत दिव्या शिंदे काय म्हणाली?

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी झालेली स्पर्धक दिव्या शिंदे बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी निवड कशी केली जाते? याबाबत बोलताना म्हणाली की, "त्यांची टीम माझ्याकडे आलेली. तीन मिटिंग झालेल्या. मी काही अटी ठेवलेल्या. त्यांनी त्या मान्यसुद्धा केल्या. मी माझ्या आजारपणाबद्दलही त्यांना सांगितलेलं. मला आराम करायला वेळ मिळाला नव्हता. मी त्यांना सांगितलेलं, मी फिजिकली फिट नाहीये. त्यावर त्यांनी मला सांगितलं, 'नाही नाही ताई...आम्ही काळजी घेऊ..."

"पण, माझी काही काळजी घेतली नाही. जेव्हा मी मरणाच्या दारात होते तेव्हा दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं. हल्ली माझा ऑक्सिजन कमी होत होता. दोन दिवसानंतर मला इंजेक्शन देण्यात आलं. तेव्हा मी रडत होते जोर-जोरात. माझी काही काळजीच त्यांनी घेतलेली नाहीये...", असं दिव्यानं पुढे बोलताना सांगितलं.

Continues below advertisement

बिग बॉसनं खरं फुटेज दाखवलंच नाही... : दिव्या शिंदे

बिग बॉसनं टास्क दरम्यान दिव्या आणि इतर स्पर्धकांमध्ये झालेल्या शा‍ब्दिक बाचाबाचीचं सर्व फुटेज काही दाखवलं नाही, असा आरोप केला आहे. तसेच, स्पष्टीकरण देताना तिनं सांगितलं की, "ज्यावेळेस मी कन्फेशन रूममध्ये होते, त्यावेळी मी म्हणालेली मला शो सोडायचाय. मी हा शो पुढे करू शकत नाही. माझ्या मान-सन्मानावर गोष्टी यायला लागल्या आहेत. हे कायम मला Poke करतायत. त्यामुळे मी बाहेर जाण्यासाठी इच्छुक आहे. आणि मला कळून गेलेलं, या गोष्टी आपल्यासाठी नाहीयेत. तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे त्यांनी दाखवलं नाहीये. त्याचबरोबर बाकीचे स्पर्धक माझ्याकडे आले, ही धमकी आहे धमकी आहे म्हणत, त्यामध्ये जे संभाषण आहे, तिथेही मी माझा मुद्दा मांडलेला. पण, त्यांनी ते दाखवलं नाही..."

"प्राजक्ता शुक्रेनं मला सांगितलं की तू म्हण 'शब्दांची तलवार' त्यावर मी तिला म्हटलं, 'अगं, तू मला हे सांगायची गरज नव्हती, कारण माझ्या डोक्यातच हे होतं. मी तेच बोलणार होते, पण थांबून बोलणार होते. हेही त्यांनी दाखवलं नाही. राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे, ओमकार राऊत, करण सोनावणे यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं, कन्फेशन रूममध्ये जाण्याअगोदर, पण त्यांनी ते फुटेजसुद्धा दाखवलं नाही. मी राकेश बापटला माझा मुद्दा स्पष्ट केला, त्यांनी बिग बॉसला समजावण्याचा प्रयत्न केला...", असं दिव्या शिंदेनं सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

विषय संपला नाही, सुरू झालाय! बिग बॉसच्या घरातून हाकालपट्टीनंतर दिव्या शिंदेचा पहिला video समोर, म्हणाली ..