Divya Bharti : दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) हिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिचं चित्रपटसृष्टीतील करिअर फारच कमी कालावधीचं होतं, पण तेवढंच सुपरहिट ठरलं. दिव्या भारतीने (Divya Bharti) 1990 साली त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आणि 1993 मध्ये तिच्या  रहस्यमय मृत्यूने साऱ्या चाहत्यांना हादरवून टाकलं. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी दिव्याने साऊथ इंडस्ट्रीत सहा चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तिच्या मृत्यूमुळे अनेक चित्रपट अपूर्ण राहिले आणि हे चित्रपट पुढे वेगवेगळ्या अभिनेत्रींकडे गेले. दिव्याच्या (Divya Bharti) नावे अजून एक विक्रम आहे – त्यांनी एका वर्षात तब्बल 12 चित्रपट केले होते. हा विक्रम आजतागायत कोणीही मोडलेला नाही.

दिव्या भारतीच्या कारकीर्दीची सुरुवात 

दिव्याने 1990 मध्ये तमिळ चित्रपट निल्ली पन्ने मधून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तेलुगु चित्रपटांमध्येही काम केलं. अखेर 1992 मध्ये विश्वात्मा या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. अल्प काळातील कारकीर्दीत त्यांनी शोला और शबनम, दीवाना, बलवान आणि रंग यांसारखे हिट चित्रपट दिले. विशेष म्हणजे लाडला हा चित्रपट तिच्या मृत्यूनंतर जवळपास 11 महिन्यांनी (१७ मार्च १९९४) प्रदर्शित झाला आणि तो सुपरहिट ठरला. या चित्रपटाची अर्धी शूटिंग दिव्याने केली होती, पण त्यांच्या निधनानंतर ती भूमिका श्रीदेवीकडे देण्यात आली.

दिव्याच्या मृत्यूनंतर कोणत्या अभिनेत्रींना चित्रपट मिळाले?

5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारती यांच्या मृत्यूनंतर खालील चित्रपट त्यांच्या ऐवजी इतर अभिनेत्रींकडे गेले:

लाडला (1994) – श्रीदेवी

धनवान (1993) – करिश्मा कपूर

मोहरा (1994) – रवीना टंडन

विजयपथ (1994) – तब्बू

आंदोलन (1995) – ममता कुलकर्णी

कर्तव्य (1995) – जूही चावला

कन्यादान (1993) – मनीषा कोइराला

हलचल (1995) – काजोल

अंगरक्षक (1995) – पूजा भट्ट

दिव्या भारती चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री

दिव्या भारती इयत्ता 9 वीत शिकत असताना तिला  मॉडेलिंग आणि चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या होत्या. त्यावेळी तिचे वय केवळ 14 इतके होते.  दिव्या भारतीने तेलुगु आणि तमिळ चित्रपटांनंतर 1992 मध्ये ऋषी कपूर आणि शाहरुख खानसोबत दीवाना चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार पदार्पण केलं. आजही दिव्या भारती त्यांच्या विश्वात्मा चित्रपटातील पार्टी सॉन्ग सात समंदर पार मुळे लोकांच्या आठवणीत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

हडकुळी आणि रोगट म्हणताच समंथा रुथ प्रभू भडकली; वर्कआऊटचा व्हिडिओ ट्रोलर्सच्या तोंडावर मारला

Dhananjay Powar Troll On Aashadhi Wari: मटण खाणारे वारीला आलेत, असं म्हणणाऱ्यांना बिग बॉस फेम धनंजय पोवारनं फटकारलं; म्हणाला...