Shefali Jariwala Death: काँटा लगा गर्ल शेफाली जरीवालाच्या (Shefali Jariwala) मृत्यूनं मनोरंजन क्षेत्र हादरून गेलंय. अवघ्या 42 व्या वर्षी तिनं या जगाचा निरोप घेतल्यानं हळहळ व्यक्त होतंय. शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack) झाल्याचं बोललं जातंय. पण त्यामागे दुसरं कोणतं कारण आहे का? याचा तपास पोलीस करतायत. अशातच शेफालीचा मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला असून तिच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आलेत. त्यापूर्वी अभिनेत्री शेफाली जरीवालाचं शवविच्छेदन करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी शवविच्छेदनाचा अहवाल सुरक्षित ठेवला असून तिच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट असल्याची माहिती मिळत आहे.  

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री शेफाली जरीवालाला गेल्या 15 वर्षांपासून मिरगीचा त्रास होता. तिच्यावर उपचार देखील सुरू होते. फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिचा मेडिकल रिपोर्ट देखील ताब्यात घेतला आहे. तसंच  शेफाली 5 ते 6 वर्षांपासून तरूण दिसण्यासाठी उपचार घेत होती. शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे. शेफाली अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत होती. या उपचारादरम्यान ती दोन प्रकारच्या गोळ्या घेत असल्याचं कळतंय. मात्र शेफाली घेत असलेल्या औषधांचा हृदयविकाराशी संबंध नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तसेच शेफाली निरोगी होती आणि तिनं ही ट्रिटमेंट घेताना इतर कुठल्याही आजाराची माहिती दिली नाही, असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे.

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पतीचे विचित्र वागण्याचा VIDEO 

अभिनेत्री आणि बिग बॉस फेम शेफाली जरीवालाच्या निधनानंतर सर्वांना धक्का बसला आहे. वयाच्या 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे. पण तिच्या निधनाच्या काही तासांनी पती पराग त्यागी प्रथमच सार्वजनिक ठिकाणी दिसला. तो पूर्णपणे खचलेला दिसत होता. शनिवारी सकाळी तो मुंबईत त्याचा पाळीव कुत्र्या सिंबासोबत बाहेर पडताना दिसला. त्याचा पाळीव कुत्र्यासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये पराग त्याच्या सोसायटीच्या आवारात फिरताना दिसत आहे. तसेच परागच्या हातात शेफालीचा फोटोही दिसत आहे. तो सिंबाला घेऊन सोसायटीमध्ये फिरताना दिसला. त्याचे हे फिरणे नेटकऱ्यांना थोडे विचित्र वाटलंय. दरम्यान पोलिसांनी शेफालीच्या मृत्यूप्रकरणी परागची चौकशी केल्याचं समजतंय.

दरम्यान, शेफालीच्या मृत्यूनंतर एक विचित्र योगायोग पहायला मिळालाय. हृदयविकारानं निधन झालेली शेफाली ही बिग बॉसमधील तिसरी स्पर्धक आहे. याआधी 2021 मध्ये सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं होतं. सिद्धार्थ आणि शेफाली दोघंही बिग बॉस 13 चे कंटेस्टेंट होते. त्यानंतर बिग बॉस 14 ची कंटेस्टंट सोनाली फोगाटचंही 2023 ला हृदयविकारानं निधन झालं होतं. त्यानंतर काल शेफाली जरीवालाचा मृत्यू झालाय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shefali Jariwala Death: 'माझी विनंती, ड्रामा करू नका...'; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीनं माध्यमांसमोर हात जोडले, काय म्हणाला? VIDEO