Disha Patani father Jagdish Singh Patani : अभिनेत्री दिशा पाटनी आणि तिची बहीण खुशबू पाटनी यांच्या घराबाहेर तीन दिवसांपूर्वी गोळीबार झाला. (Disha Patani father Jagdish Singh Patani) दिशाच्या बरेलीतील घरावर दोन अज्ञात हल्लेखोर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मोटारसायकलवर येऊन गोळीबार करून गेले. (Disha Patani father Jagdish Singh Patani) या फायरिंगची जबाबदारी रोहित गोदारा गँगने स्वीकारली असून सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याची पुष्टीही केली आहे. आता दिशा हिचे वडील जगदीश सिंह पाटनी यांनी निवेदन दिले आहे. त्यांनी सांगितले की पोलिसांनी तत्परता दाखवली असून फायरिंग प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे. (Disha Patani father Jagdish Singh Patani) तसेच पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली असून घराभोवती पोलिसांचा तगडा ताफा तैनात आहे.

Continues below advertisement

जगदीश सिंह पाटनी म्हणाले, “माझ्या मुलीचे विधान तोडून–मोडून सादर करण्यात आले आहे. आम्ही सनातन धर्म मानणारे आहोत. हे योगीजींचे राज्य आहे. अशा प्रकारच्या गुंडगिरीवर पूर्णपणे लगाम घातली जावी. फायरिंगमुळे आम्ही सर्वजण दहशतीत होतो. माझी झोपही उडाली होती. बाहेर यायचा प्रयत्न केला पण कसाबसा आडोसा घेऊन वाचलो. 8–10 राऊंड फायर झाले.”

रोहित गोदारा यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना जगदीश पाटनी म्हणाले, “मी फेसबुकवर वाचले आहे. पण त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. कारण फेसबुक आणि मीडियावर ज्या गोष्टी असतात, जसे टिप्पणी करणे किंवा आपली मते मांडणे – त्याला कोणी फारसे गांभीर्याने घेत नाही. आपल्या संविधानात प्रत्येकाला स्वतःची मते मांडण्याचा आणि बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण जर असला प्रकार घडला, तर त्याबद्दल काही स्पष्ट सांगता येणार नाही.”

Continues below advertisement

दिशा पाटनीच्या घराला पोलिसांचा वेढा

सुरक्षेबाबत जगदीश पाटनी म्हणाले, “सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहता पोलिसांनी सगळ्यात आधी आमची सुरक्षा केली आहे. बाहेर गार्ड्स लावलेले आहेत, मागे पोलीस तैनात आहेत. पोलिसांनी कोणतीही कसूर केलेली नाही. पोलिसांना माहिती मिळाल्यापासून ते पूर्ण कामकाजाच्या मोडमध्ये आहेत.”

रोहित गोदारा म्हणाला, ही फायरिंग म्हणजे ‘ट्रेलर’ 

रोहित गोदारा याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, हा हल्ला खुशबू पाटनीमुळे करण्यात आला आहे. त्याचे म्हणणे आहे की खुशबूने प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांच्याविषयी टिप्पणी केली होती. हा त्याचा बदला आहे. रोहित गोदारा यांच्या व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे – “जो आमच्या धर्म आणि संतांविरुद्ध बोलेल, त्याच्या घरावर ठायं–ठायं होईल. आमच्या सनातन धर्माला नीचा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. आमच्या आराध्य देवी–देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. हे तर फक्त एक ट्रेलर होते.”

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Aamir Khan On Bollywood Stars Demands: 'कोट्यवधींचं मानधन घेतात, पण ड्रायव्हरचे पैसेही निर्मात्याकडे मागतात...'; सेलिब्रिटींचे नखरे अन् मागण्यांवर स्पष्टच बोलला आमिर खान