Raj Kapoor Death Anniversary : हिंदी चित्रपटसृष्टीमधील शो-मॅन अशी ओळख असणाऱ्या राज कपूर (Raj Kapoor) यांची आज पुण्यतिथी आहे. 2 जून 1988 रोजी त्यांचे निधन झाले. राज कपूर यांच्या आवारा (Awara), श्री 420 (Shree 420) आणि बरसात (Barsaat) या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पृथ्वीराज कपूर हे राज कपूर यांचे वडील आहेत. राज यांनी वयाच्या दहाव्या वर्षी इंकलाब या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम केले. पण राज कपूर यांचं आयुष्य एका थप्पडमुळे बदललं होतं.


चित्रपटाच्या सेटवरील किस्सा


सुरुवातीच्या काळात वडिलांच्या सांगण्यावरून राज यांनी क्लॅप बोर्ड घेऊन चित्रपटाच्या सेटवर उभे राहण्यास सुरुवात केली होती. राज यांना वाटत होते की ते स्क्रिनवर दिसावेत, त्यासाठी ते सतत त्यांचे केस सेट करत होते. एकदा राज कपूर पडद्यावर दिसण्यासाठी चित्रपटाच्या अभिनेत्याच्या एवढ्या जवळ गेले की क्लॅप देताना त्या क्लॅप बोर्डवर अभिनेत्याची दाढी अडकली. हे पाहून दिग्दर्शक केदार शर्मा यांना खूप राग आला आणि त्यांना राज कपूर यांच्या कानशिलात लगावली. त्यावेळी राज यांनी कोणतीही रिअॅक्शन दिली नाही. ते काम करत राहिले. दुसऱ्या दिवशी दिग्दर्शक केदार शर्मा यांनी राज यांना पुन्हा सेटवर बोलावले आणि त्यांच्या नील कमल या चित्रपटामध्ये राज यांना प्रमुख भूमिका साकारण्याची संधी दिली. हे ऐकताच राज कपूर यांना अश्रू अनावार झाले. 
 
केदार शर्मा यांनी त्यावेळी राज कपूर यांना विचारले, 'मी तुला कानशिलात लगावली, तेव्हा तू रडला नाही मग आता का रडत आहेस?' यावर राज कपूर म्हणाले, 'मी हीरो होणार आहे. त्यामुळे हे आनंदाचे आश्रू आहेत.'  चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर एका वर्षातच राजने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आरके स्टुडिओ सुरू केले. या प्रॉडक्शनने आवारा, बूट पॉलिश, श्री 420, बॉबी आणि प्रेम रोग सारख्या हिट चित्रपटांची निर्मिती केली. 


हेही वाचा :