Dilwale Dulhania Le Jayenge DDLJ box office collection : यशराज फिल्म्सच्या (YRF) ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ) या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 29 वर्षं उलटून गेले आहेत. मात्र, आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. राज आणि सिमरनची प्रेमकहाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या चित्रपटाने केवळ यशराज फिल्म्सच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक म्हणून नाव कमावलं नाही, तर मुंबईच्या मराठा मंदिर चित्रपटगृहात सलग 1,000 आठवड्यांपर्यंत प्रदर्शित होणारा चित्रपट ठरल्याने एक ऐतिहासिक कामगिरीही केली आहे.
पण अनेकांना हे माहीत नसेल की, 1995 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यावेळी मिळालेल्या एकूण कमाईच्या तुलनेत आजच्या हिशोबाने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. त्यावेळी DDLJ ने सुमारे 61 कोटी रुपये कमावले होते. आजच्या मूल्यानुसार ही रक्कम सुमारे 302 कोटी रुपये होते. त्याच्या अगोदर आहे 1994 मध्ये आलेला सलमान खान आणि माधुरी दीक्षितचा ‘हम आपके हैं कौन’, ज्याने आजच्या तुलनेत 354 कोटी रुपये कमावले आहेत.
मराठा मंदिरमध्ये आजही दररोज एक शो (सकाळी 11.30 वाजता) दाखवला जातो. या शोचं तिकीट सरासरी 40 किंवा 60 रुपये आहे. चित्रपटगृह आणि स्टुडिओ यांच्यातील व्यवहार ‘भाडे तत्वावर आधारित’ आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये चित्रपटाचा सरासरी प्रेक्षक प्रतिसाद 40% इतका राहिला आहे. शनिवार-रविवारी तर “हाऊसफुल”चा फलकही लावला जातो.
उद्योग विश्लेषकांच्या मते, या चित्रपटाला एकूण 1 कोटी प्रेक्षक मिळाले असावेत आणि यातून साधारण 14 ते 16 कोटी रुपये कमाई झाली असावी. त्यामुळे DDLJ ची एकूण 19 वर्षांतील कमाई सुमारे 77 कोटी रुपये होती.
DDLJ हा आदित्य चोप्राचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने GP सिप्पी यांच्या 'शोले'चा विक्रम मोडून निघाला. ‘शोले’ मुंबईच्या मिनर्वा थिएटरमध्ये सलग 5 वर्षं दाखवला गेला होता. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ने त्याकाळी 15 कोटी रुपये कमावले होते, जे आजच्या हिशोबाने सुमारे 187 कोटी रुपये आहेत.
युरोप आणि पंजाब या पार्श्वभूमीवर आधारित DDLJ भारतात आणि परदेशातही प्रचंड लोकप्रिय ठरला. परदेशात या चित्रपटाने सुमारे 10 कोटी रुपये कमावले होते.
चित्रपट विश्लेषकांच्या मते, DDLJ चं यश केवळ शाहरुख आणि काजोल यांची केमिस्ट्रीमुळे नाही, तर प्रेमकथेच्या सादरीकरणामुळे आहे. चित्रपटातील संवाद आणि संगीत हे यशाचे प्रमुख मुद्दे होते. या चित्रपटाचं मार्केटिंग देखील तितकंच लक्षवेधी ठरलं – शाहरुखच्या टोपी आणि खांद्यावर काजोलला उचललेला फोटो आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.
बॉक्स ऑफिस विश्लेषक सुनील वाधवा म्हणतात, “तुम्ही कोणत्याही गोष्टीवर चित्रपट बनवू शकता, जोपर्यंत त्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासारखी पकड आहे. सिनेमा ही अशी कला आहे जी एकाकीपणाची जाणीव विसरवते. प्रेक्षक त्या सृष्टीत हरवतात, स्वतःला त्या कथेत पाहतात.”
इतर महत्त्वाच्या बातम्या