Digpal Lanjekar On Chhava Movie: 2025 मधल्या ब्लॉकबस्टर सिनेमांबाबत (Blockbuster Movie) चर्चा झाली, तर कुणीच 'छावा' सिनेमाचं (Chhaava Movie) नाव डावलून पुढे जाऊच शकत नाही. महाराष्ट्राचे धाकले धनी, छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिस (Box Office Collection) चांगलंच गाजवलं. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 800 कोटींचा गल्ला जमवला. सिनेमात शंभू राजांच्या भूमिकेत विक्की कौशल, तर युवराज्ञींच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आणि मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकलेला. या सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालं. मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं. पण, सिनेमा रिलीज होण्यापूर्वी या सिनेमातील एका गाण्यावरुन मात्र मोठा गदारोळ झालेला. अखेर दिग्दर्शकांनी या सिनेमातून ते गाणं वगळण्याचा निर्णय घेतला. अशातच आता कित्येक महिन्यांनी मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी 'छावा' सिनेमातल्या वादग्रस्त गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या 'अभंग तुकाराम' सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम अनेक ठिकाणी भेटीगाठी देत आहे. तर काही मुलाखतीही प्रसिद्ध झाल्या आहेत. अशातच सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी काही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजनविश्व चॅनलला मुलाखत दिलेली. या मुलाखतीत बोलताना त्यांना 'छावा' सिनेमावर भाष्य केलं. तसेच, सिनेमातून काढून टाकण्यात आलेल्या लेझीम सीनवरही त्यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं.  

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर नेमकं काय म्हणाले? 

'छावा' सिनेमातल्या लेझीम सीनबाबत बोलताना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले की, "आपण त्या काळाचं भान ठेवलं पाहिजे, असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हे आपलं दैवत आहेत. त्यांचे मावळे सुद्धा... हे लोक ज्या काळात होते, त्या काळात काही नियम होते... काही नियम जसे आज पाळले जातात, तसे त्या काळातही होते... छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळले नसतील का? तर असतील कारण तो महाराष्ट्राचा मर्दानी खेळ आहे. पण तो खेळत असताना प्रसंग कुठला आहे? त्याचं तारतम्य काय? याचा विचार केला गेला पाहिजे... जेव्हा आम्ही सिनेमा बनवतो, तेव्हा आपल्याकडे दुर्दैवानं कमी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे सिनेमेटोग्राफरची अडचण समजू शकतो... पण तुम्हाला काही नियमांचे बिंदू सापडतात, त्याला काहीतरी कलात्मक गोष्टी जोडाव्या लागतात... एवढीच लिबर्टी असावी..."

Continues below advertisement

"मी आतापर्यंत सात सिनेमे केले. माझ्या आतापर्यंत एकही सिनेमाबद्दल आक्षेप नोंदवला गेला नाही, कारण ते अत्यंत श्रद्धेनं केले गेलेले सिनेमे आहेत. ते नृत्य वगळलं गेलं तर माझं मत असं आहे की, थोडासा इतिहासाचा अभ्यास कमी पडला का काय? कारण त्या फिल्ममेकर्सना मी अत्यंत आदरानं सांगू इच्छितो की, सहाच महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालेलं, एवढा आभाळासारखा बाप हरपला असताना कुणीही मावळ्यानं असो, सरदारानं असो कुणीही कितीही आग्रह केला तरीही आपल्या त्या आकाशाएवढ्या पित्याला दैवत मानणाऱ्या राजपुत्राकडून नृत्य घडेल का? हा लॉजिकचा भाग... हा त्या फिल्ममेकरनं विचार करण्याचा भाग आहे.", असं दिग्पाल लांजेकर म्हणाले. 

"जेवढा छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा थाटात पार पडला, तेवढा संभाजी महाराजांचा नाही झाला, कारण तेव्हा स्वराज्याच्या आसपासची परिस्थिती... त्यावेळी स्वराज्य संक्रमणावस्थेतून जात होतं... छत्रपती शिवाजी महाराज गेलेत, हे पाहून सगळे शत्रू तुटून पडले होते... त्यावेळी एवढा जाणता पुत्र त्या सोहळ्यामध्ये रमणार नाही... छत्रपती संभाजी महाराजांनी तो छोट्या प्रमाणात केला... पण तो भव्य दाखवून आपण महाराजांचा कुठे अपमान करत नाही का? हा तारतम्याचा भाग आहे...", असं दिग्पाल लांजेकर म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mahesh Manjrekar On Siddharth Bodke: छत्रपतींच्या भूमिकेसाठी निगेटिव्ह रोल्स करणाऱ्या सिद्धार्थ बोडकेलाच का निवडलं? महेश मांजरेकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं...