Avatar Fire And Ash Box Office Collection: समुद्रात आपणच मोठी लाट असल्याच्या आविर्भावात येणाऱ्या लाटेला मागून एखाद्या अजस्र लाटेने गिळून टाकावं अशी अवस्था सध्या बॉलीवूडची झालीय. बॉक्स ऑफिसवर धुरंधरची तुफान चर्चा सुरू असतानाच हॉलीवूडच्या एका बिग बजेट फिल्मने सगळ्यांनाच गिळून टाकलंय. अपेक्षेपेक्षा कमी गाजावाजा असूनही या सिनेमानं ओपेनिंगलाच 500 कोटींना हात घातला. भारतात पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार करत थेट इतिहास रचलाय. एवढंच नाही तर या धडाकेबाज कमाईमुळे बॉलिवूडचे अनेक मोठे प्रोजेक्ट्सही सावध झाले आहेत.
धुरंधरच्या जोरदार लाटेत Avatar: Fire And Ash प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात यशस्वी ठरत आहे. अपेक्षेपेक्षा कमी ओपनिंग असूनही या चित्रपटाने अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या अनेक हॉलीवूड बिगीजपेक्षा चांगली कमाई केली आहे. विशेष म्हणजे 2025 मध्ये भारतात प्रदर्शित झालेल्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये अवतार 3ने पहिला नंबर पटकावलाय.
सातव्या दिवशी कमाईत मोठी उसळी
चित्रपटाने सातव्या दिवशी 13.3 कोटींची कमाई केली असून, सहाव्या दिवसाच्या (10.65 कोटी) तुलनेत ही वाढ तब्बल 24.88 टक्के आहे. ख्रिसमस सुट्टीचा (25 डिसेंबर) याचा मोठा फायदा झाल्याचं स्पष्ट दिसतं. आतापर्यंत अवतार: फायर अँड अॅश ने भारतात एकूण अंदाजे 109.45 कोटी नेट कमाई केली असून, ही कमाई 132.75 कोटी ग्रॉस इतकी आहे. 109.45 कोटींच्या कमाईसह अवतार: फायर अँड अॅश ने Mission: Impossible- The Final Reckoning (106.9 कोटी) ला मागे टाकत 2025 मधील भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हॉलीवूड चित्रपट ठरला आहे.
दिवसागणिक कमाई (नेट):
पहिला दिवस - 19 कोटी
दुसरा दिवस - 22.5 कोटी
तिसरा दिवस - 25.75 कोटी
चौथा दिवस - 9 कोटी
पाचवा दिवस - 9.3 कोटी
सहावा दिवस - 10.65 कोटी
सातवा दिवस - 13.3 कोटी
एकूण - 109.45 कोटी
भारतामधील 2025 चे टॉप 5 हॉलीवूड ग्रॉसर्स (नेट):
अवतार: फायर अँड ॲश - 109.45 कोटी (7 दिवसांत)
मिशन इम्पॉसिबल: द फायनल रेकनिंग -106.9 कोटी
एफ1 - 102.82 कोटी
ज्युरासिक वर्ल्ड: रीबर्थ - 100.56 कोटी
द कॉन्ज्युरिंग: लास्ट राइट्स - 82.11 कोटी
पहिल्या ‘अवतार’ला मागे टाकणार का?
सध्या Avatar: Fire And Ash हा अवतार फ्रँचायझीमधील सर्वात कमी कमाई करणारा भाग आहे. पहिल्या अवतारने भारतात सुमारे 141.25 कोटी नेट कमावले होते. मात्र आतापर्यंत 109.45 कोटींची कमाई झाल्याने आणि ख्रिसमस-नववर्षाच्या सुट्टीचा फायदा मिळाल्याने हा टप्पा पार करण्याच्या दिशेने चित्रपट वेगाने वाटचाल करत आहे.पण, Avatar: The Way Of Water ची 390.6 कोटींची विक्रमी कमाई गाठणं मात्र सध्या अशक्यच वाटत आहे.