Dhurandhar व OTT:आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’नंतर दिग्दर्शकाच्या कारकिर्दीतील दुसरा मोठा यशस्वी चित्रपट ठरला आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांसारख्या दमदार कलाकारांनी सजलेला हा स्पाय थ्रिलर तब्बल साडेतीन तासांचा असूनही प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचण्यात यशस्वी ठरला. सध्या ‘धुरंधर’ हा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

Continues below advertisement

जगभरात जबरदस्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 879 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून, वर्ल्डवाइड कमाई 1325 कोटींच्या पुढे गेली आहे. मात्र, आता हा चित्रपट फार काळ मोठ्या पडद्यावर राज्य करणार नाही. ‘बॉर्डर 2’ प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच ‘धुरंधर’ ओटीटीवर दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

‘बॉर्डर 2’च्या रिलीजदरम्यान थिएटरमधून उतरणार ‘धुरंधर’

होय, ‘धुरंधर’ आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट याच महिन्यात ऑनलाइन स्ट्रीम होण्याची शक्यता आहे. या महिन्यात ‘बॉर्डर 2’सोबतच राणी मुखर्जीचा ‘मर्दानी 3’ देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘धुरंधर’च्या कमाईवर परिणाम होणं अपेक्षित आहे. दोन मोठ्या चित्रपटांच्या स्पर्धेत ‘धुरंधर’ मोठ्या पडद्यावरून उतरून ओटीटीवर प्रेक्षकांच्या  भेटीला येणार आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षकांना थरार अनुभवता येणार आहे.

Continues below advertisement

‘धुरंधर’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार?

इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रणवीर सिंहचा हा स्पाय थ्रिलर नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 जानेवारीपासून ‘धुरंधर’ ओटीटीवर पाहता येऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

‘धुरंधर 2’ कधी होणार रिलीज?

‘धुरंधर’ भलेही सिनेमागृहातून उतरणार असला, तरी या फ्रँचायझीचा क्रेझ अजून कमी झालेला नाही. कारण लवकरच ‘धुरंधर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर ‘बॉर्डर 2’सोबत रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. ‘धुरंधर 2’ 19 मार्च 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून, त्याची टक्कर रॉकिंग स्टार यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाशी होणार आहे.