दिल्ली : 2026 च्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा विभागीय स्तरावर संपन्न झाली आहे. 24 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय बालभवन येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत सादरीकरणासाठी 16 संघांची निवड करण्यात आली आहे. देशभरातील शालेय मुलांमध्ये देशभक्ती आणि एकतेची भावना पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि पुन्हा जागृत करण्यासाठी आयोजित केलेल्या 16 संघांमध्ये ब्रास बँड बॉईज, ब्रास बँड गर्ल्स, पाईप बँड बॉईज आणि पाईप बँड गर्ल्स या प्रत्येक झोनमधून (पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण) चार संघ सहभागी होतील. अंतिम फेरीत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे  संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज विभागाचे पथक पश्चिम भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. 

स्पर्धेंच्या अंतिम फेरीसाठी दोन शाळांची निवड झाली 

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजीत राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या विभागीय स्तरावरील फेऱ्यांची यशस्वी सांगता झाली आहे. स्पर्धेंच्या अंतिम फेरीसाठी दोन शाळांची निवड झाली आहे. यात पश्चिम विभागातून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवनी सैनिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मुलांचे ब्रास ब्रँड पथकाची निवड झाली आहे. हा कोपरगावकरांसाठी आनंदाची बाब आहे.

देशातील सर्वच बँड पथकामध्ये संजीवनीचा बँडपथक अव्वल 

देशातील सर्वच बँड पथकामध्ये संजीवनीचा बँडपथक अव्वल ठरला आहे. आता राज्याचे नेतृत्व  संजीवनीचा बँडपथक करत आहे. यामुळं संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. त्यांचे देखील यासाठी मोठे सहकार्य लाभल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे. 26 जानेवारीला संजीवनी सैनिक स्कूलने वाजवलेला बँड चारही दिशेला घुमणार आहे. देशैातील चार विभागनिहाय पथके दिल्लीत रवाना होणार आहेत. यामध्ये कोपरगावचे बँड अव्वल ठरणार आहे.