Sanjay Dutt Son photos goes viral: 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' (Dhurandhar) या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. रणवीर सिंहसह इतर कलाकारांनी उत्तमरित्या आपली भूमिका वठवली. सध्या सर्वत्र संजय दत्तने (Sanjay Dutt) साकारलेली एसएसपी अस्लम चौधरी ही भूमिका खूप गाजली. एक तडफदार पोलिसाची भूमिका त्याने साकारली. त्याच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे. अलिकडेच त्याने आपल्या फॅमिलीसह एका इव्हेंटमध्ये धमाकेदार एन्ट्री मारली. यावेळी संजय दत्त आपल्या सिग्नेचर स्टाइलमध्ये स्पॉट झाला. त्याची वाइफ मान्यता दत्त देखील खूप ग्लॅमरस दिसत होती. पण या इव्हेंटमध्ये संजय दत्तचा मुलगा शहरान दत्त भाव खाऊन गेला. संपूर्ण फॅमिलीचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
संजय दत्तच्या मुलांनी आता यंग एजमध्ये पदार्पण केलंय. खरंतर, शनिवारी रात्री मुंबईत एका इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. या इव्हेंटमध्ये संजय दत्तलाही आमंत्रण देण्यात आलं होतं. संजय दत्तसह, मान्यता दत्त आणि त्यांची दोन मुलंही दिसली. या इव्हेंटमधील लाइमलाइट दत्त कुटुंब ठरले. या इव्हेंटसाठी खास संजय दत्तने पठानी परिधान केली होती. तर, मान्यताने शिमरी हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता. संजय दत्तची मुलगीही प्रचंड क्यूट दिसत होती. तिनं अॅनिमल प्रिंट टॉपवर ब्लॅक स्कर्ट घातला होता.
संजय दत्तच्या मुलीने आपल्या क्यूटनेसने लोकांची मने जिंकली. या सगळ्यात संजय दत्तच्या मुलाने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. दत्त फॅमिली इव्हेंटमध्ये पोहोचताच पापाराझींनी त्यांच्याभोवती घेराव घातला. तसेच फोटो व्हिडीओ शूट केले. सध्या दत्त फॅमिलाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विशेष संजय दत्तच्या मुलाचं कौतुक केलं.
एका युझरने, '2028मध्ये न्यू संजू बाबा येतो आहे', अशी कमेंट केली आहे. तर, आणखी एका नेटकऱ्याने, 'छोटा संजू बाबा' अशी कमेंट केली आहे. तर, काही नेटकऱ्यांनी संजय दत्तच्या मुलीचं कौतुक केलं.
माहितीनुसार, संजय दत्तने मान्यतासोबत 2008 साली लग्न केलं होतं. लग्नानंतर मान्यताने जुळ्या मुलांना जन्म दिला. शाहरान आणि इकरा असे त्यांच्या मुलांचे नाव आहे. 21 ऑक्टोबर रोजी संजय दत्त 2 जुळ्या मुलांचे वडील झाले.
