Dhurandhar Box Office Collection Day 12: अक्षय खन्ना (Akshaye Khanna) रणवीर सिंहचा (Ranveer Singh) 'धुरंधर' (Dhurandhar Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) तुफान कमाई करतोय. 'धुरंधर'मुळे बॉक्स ऑफिसवर जणू वादळ आलंय. रिलीज झाल्यापासूनच 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिसवर ताबा मिळवलाय. रिलीज झाल्यापासून 'धुरंधर'नं अनेक दिग्गजांना धूळ चारली आहे. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी रेकॉर्डब्रेक केल्यानंतर, आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित स्पाय, थ्रीलर सिनेमा (Spay Thriller Cinema) दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील दुसऱ्या सोमवारी हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अशातच आता दुसऱ्या मंगळवारीही 'धुरंधर'नं धमाकेदार कमाई केली आहे. सिनेमा रिलीज होऊन दहा दिवस झाले, तरीसुद्धा सिनेमाची क्रेझ काही कमी झालेली नाही. 2025 च्या सुरुवातीला विक्की कौशलच्या 'छावा' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर राज्य केलेलं, पण त्यानंतर संपूर्ण वर्षभरात कोणत्याही सिनेमाला अशी दमदार कामगिरी करता आली नाही. अखेर आता 'धुरंधर'नं छावाप्रमाणे बॉक्स ऑफिसवर ताबा मिळवला आहे.
'धुरंधर'ची बाराव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर मुसंडी
बॉलिवूड स्पाय अॅक्शन थ्रिलर 'धुरंधर' सिनेमा प्रदर्शित होऊन 12 दिवस झालेत आणि तरीसुद्धा तो बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करतोय. यंदाच्या वर्षात रिलीज झालेल्या अनेक बॉलिवूड सिनेमांच्या रिलीजपेक्षा 'धुरंधर' धमाकेदार कमाई करतोय. 'धुरंधर'चे सकाळ, दुपारचे शो गेम चेंजर ठरत आहेतच. पण खरे गेम-चेंजर शो आहेत, संध्याकाळचे आणि रात्रीचे शो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 'धुरंधर' सिनेमा खूप मोठा आहे. तब्बल 3 तास 32 मिनिटांचा सिनेमा असूनही लोकांवर 'धुरंधर'ची क्रेझ पाहायला मिळतेय. 'धुरंधर'नं दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी भारतात तब्बल 140 कोटींची कमाई करुन हिंदी सिनेमांसाठी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दुसऱ्या सोमवारी 'धुरंधर'नं पुन्हा धमाकेदार कमाई केली आहे. 'धुरंधर'नं तब्बल 29 कोटींची कमाई केलीय.
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'धुरंधर'नं रिलीजच्या बाराव्या दिवशी म्हणजेच, दुसऱ्या मंगळवारी 30 कोटी रुपये कमावले आहेत. यासोबतच, 'धुरंधर'ची भारतात 12 दिवसांची एकूण कमाई आता 411.25 कोटी झाली आहे.
'धुरंधर'ची दुसऱ्या मंगळवारी सर्वाधिक कमाई
'धुरंधर'नं बॉक्स ऑफिसवर खऱ्या अर्थानं कब्जा केला आहे. हा चित्रपट केवळ धुवांधार कमाईच करत नाही तर, दररोज मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही मागे टाकतोय. दुसऱ्या मंगळवारी 30 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह, त्यानं पुष्पा 2 (18.5 कोटी), छावा (18.5 कोटी), बाहुबली 2 (15.75 कोटी) आणि जवान (12.9 कोटी) सारख्या चित्रपटांना मागे टाकले आणि बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांचा विक्रम प्रस्थापित केला. हा चित्रपट ज्या वेगानं कमाई करतोय, ते पाहता असं दिसतंय की, तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट 500 कोटींचा होईल.
'धुरंधर' फटाफट 400 कोटी छापणारा पाचवा सिनेमा
'धुरंधर'ने रिलीजच्या 12 व्या दिवशी मोठी कमाई करून आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. हा सिनेमा सर्वात वेगानं 400 कोटींचा टप्पा ओलांडणारा पाचवा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. 12 दिवसांत 405 कोटी रुपये कमाई करून, त्यानं 'स्त्री 2' च्या 402.8 कोटी रुपये आणि 'गदर 2' च्या 400.7 कोटी रुपयांना मागे टाकले आहे.
'धुरंधर' विरुद्ध 'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन
'छावा' सध्या 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे. विक्की कौशल अभिनीत या चित्रपटानं 12 दिवसांत 363.25 कोटी रुपये कमावलेत. रणवीर सिंहच्या 'धुरंधर'नं 12 दिवसांत 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याचा अर्थ 'धुरंधर'नं आता 'छावा'ला मागे टाकलं आहे. त्यामुळे, रणवीर सिंहचा 'धुरंधर' विकी कौशलच्या चित्रपटाच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकू शकेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विशेष म्हणजे, दोन्ही चित्रपटांमध्ये अक्षय खन्ना खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :