Aditya Dhar Dhurandhar: आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटाने (Aditya Dhar Dhurandhar) बाॅक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रणबीर सिंह चित्रपटाचा नायक असला, तरी आयुष्याच्या सेकंड इंनिगमध्ये यशाची चव चाखत असलेला अक्षय खन्ना भलताच चर्चेत आहे. सोशल मीडियावर अक्षयच्या अभिनयाची जोरदार चर्चा असून महिलांनी सुद्धा त्याला डोक्यावर घेत त्याच्या स्वॅगचं कौतुक केलं आहे. अक्षयने रहमन डकैत जबरदस्त साकारला असून पडद्यावरील त्याचा वावर प्रेक्षकांच्या नरजेत भरणारा आहे. त्यामुळे कराचीत लियारी गँग चालवणारा रहमत डकैत होता तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रहमत डकैतचा (Lyari Karachi Crime History) शेवट कसा झाला? एसपी चौधरीनेच त्याचा खात्मा केला, पण ते सुद्धा वादात का सापडले? लियारीला मदर ऑफ कराची का म्हणत होते? याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत. 

Continues below advertisement

'मदर ऑफ कराची' लियारी भाग आहे तरी कसा? (Karachi gang wars history)

धुरंदर चित्रपटात लियारी भाग चर्चेत आहे. तेथील गुन्हेगारी पदद्यावर थरकाप आणल्याशिवाय राहत नाही. हाच लियारी कराचीतील सर्वात जुना परिसर समजला जातो. 18व्या शतकात सिंधी आणि बलोच मच्छीमारांनी वसवलेली ही वस्ती लियारी नदीलगत वाढत गेली आणि ‘मदर ऑफ कराची’ म्हणून ओळखली जाते. ब्रिटिश काळात लियारीमधील कामगारांनी कराचीच्या बंदराला गती दिली, पण पाकिस्तानची निर्मिती होताच हा भाग विकासापासून दूर राहिला. त्यातून गरीबी, राजकीय असंतोष आणि पुढे गुन्हेगारी अशी साखळी तयार होत गेली. झुल्फिकार अली भुट्टो यांच्या काळापासून लियारी पीपीपीचे बालेकिल्ला होता. एकेकाळी डाव्या विचारांच्या चळवळी आणि  क्रीडा संस्कृतीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या या भागात 2000 नंतर परिस्थिती बिघडली. ड्रग्स, खंडणी, शस्त्रधारी टोळ्या, ‘पिपल्स अमन कमिटी (PAC)’ सारख्या संघटना आणि त्यांच्या टर्फ वॉरमुळे लियारी ‘नो-गो झोन’ झाला होता. 

रहमन डकैत: लियारीचा कुख्यात डॉन (Lyari don Rehman) 

सदार अब्दुल रहमान बलोच उर्फ रहमन डकैत, जन्म 1975 च्या सुमारास. त्याचे कुटुंब पूर्वीपासून ड्रग्स तस्करीत गुंतले होते. रहमानने सुद्धा तोच कित्ता गिरवत मिशा फुटण्यापुर्वीच ड्रग्स विकणं सुरू केलं. पुढे तो चाकू हल्ले, अपहरण, सुपारी किलिंग यांसारख्या गुन्ह्यांत उतरला. त्याने PAC ला गुन्हेगारी आणि राजकी आश्रयाचे ठिकाण करून टाकलं. पीपीपीतील काही लोकांशी त्याचे संबंध असल्याचे म्हटले जाते. दंडेलशाही,लोकांना धमकावणे, मारहाण, अगदी शिरच्छेदासारखे आरोपही त्याच्यावर झाले. प्रतिस्पर्धी टोळीप्रमुख बाबू डकैतशी त्याचा रक्तरंजित संघर्ष होता. लियारी रस्त्यांवर सतत गोळीबार, बॉम्ब हल्ले, बदला या सर्वांचे केंद्र रहमानच होता. 9 ऑगस्ट 2009 रोजी पोलिसांनी झालेल्या चकमकीत रहमान डकैत ठार झाल्यानंतर या काळाचा मोठा शेवट झाला.

Continues below advertisement

SP चौधरी असलम: ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ (Chaudhry Aslam Encounter) 

चौधरी असलम खान, सिंध पोलिसांच्या CID मधील अधिकारी होते. 1980–2000 या काळात कराचीतील गुन्हेगारी, धर्मांध दहशतवादी गट, लियारीतील टोळ्यांविरुद्ध कारवायांमुळे प्रसिद्ध झाले. ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून वादग्रस्त असूनही लोकांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्यावर अनेक दहशतवादी हल्ले झाले पण ते बचावले. अखेर 2014 मध्ये TTP ने केलेल्या रस्त्यावरील बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला. हा कराची पोलिसांवरील मोठा आघात मानला जातो. 

धुरंधर (2025): चित्रपटातील वास्तवावर आधारित (Aditya Dhar Dhurandhar Movie)

बॉलिवूडचा धुरंधर (2025) हा चित्रपट वास्तवावर आधारित आहे. अक्षय खन्ना रहमान डकैतच्या भूमिकेत तसेच PAC, ड्रग्स, खंडणी, राजकीय संबंध आणि 2009 मधील त्याचा अंत या सर्व गोष्टी चित्रपटात दाखवल्या आहेत. संजय दत्त SP चौधरी असलमच्या भूमिकेत, ज्यात लियारीतील धाडसी छापे, गुन्हेगारांवरील कारवाया आणि एन्काऊंटर दाखवले आहेत. चित्रपटात भारतीय गुप्तचर विभाग, काही काल्पनिक प्रसंग आणि घटना असल्या तरी लियारीचा हिंसाचार, ड्रग्स, टोळीवाद हे वास्तव तसंच ठेवण्यात आलं आहे.

रहमन डकैतचा अंत कसा झाला? (Rehman Dakait Death) 

9 ऑगस्ट 2009 रोजी झालेल्या चकमकीत SP/SSP चौधरी असलम खान यांच्या टीमने रहमान डकैतला ठार केले. पोलिसांना रहमान डकैत आणि त्याचे साथीदार हैदराबाद वरून कराचीला येत असल्याची माहिती मिळाली. लिंक रोड, कथोर नॅशनल हायवे जवळ पोलिसांनी त्यांना थांबवलं होते. गाडी थांबवली तेव्हा डकैतच्या टोळीने गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रतिकार करत केलेल्या कारवाईत रहमन डकैत, अकील बलोच, औरंगजेब बाबा, नजीर बाला हे चौघे ठार झाले. घटनास्थळावरून पोलिसांना AK-47, पिस्तुले, ग्रेनेडसुद्धा मिळाले. त्यांचे मृतदेह जिन्ना पोस्टग्रॅज्युएट मेडिकल सेंटरला पाठवण्यात आले. या चकमकीपूर्वी एका CID इन्स्पेक्टरच्या खुनात रहमानचा हात असल्याचे समोर आले होते, म्हणून पोलिसांचा दबाव वाढला होता. रहमनच्या पत्नीने हा ‘फेक एन्काऊंटर’ असल्याचा आरोप केला. त्यामुळे सिंध हायकोर्टाने SSP चौधरी असलम यांच्यावर FIR नोंदवण्याचे आदेश दिले होते.

इतर महत्वाच्या बातम्या