Aaditya Thackeray At Pooja Birari Soham Bandekar Reception: मराठी अभिनेत्री (Marathi Actress) पूजा बिरारी (Pooja Birari) आणि अभिनेता सोहम बांदेकर (Soham Bandekar) यांचा शाही रिसेप्शन सोहळा (Pooja Birari Soham Bandekar Reception Function) नुकताच पार पडला. थाटामाटात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी राजकीय आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावलेली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut), विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईत (Mumbai News) रंगलेल्या या शाही रिसेप्शनचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या सोहळ्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) उपस्थित होते. आदित्य ठाकरेंनी या सोहळ्याला उपस्थित राहून सोहम बांदेकर (Soham Bandekar Wedding) आणि पूजा बिरारीला शुभेच्छा दिल्या. तसेच, सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकरांचीही भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं.  

Continues below advertisement

सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीच्या शाही रिसेप्शन सोहळ्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या सोहळ्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहिलेले. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आदित ठाकरे सोहम आणि पूजाला भेटून शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर पोहोचतात, पण त्यापूर्वी त्यांची भेट आदेश बांदेकरांसोबत होते.

Continues below advertisement

आदेश बांदेकर आदित्य ठाकरेंना पाहून खूपच खूश होतात आणि त्यांना कडकडून मिठी मारतात. आदित्य ठाकरेही आदेश काकांना मिठी मारतात. त्यानंतर आदित्य ठाकरे बांदेकरांचं अभिनंदन करतात. पुढे सुचित्रा बांदेकरांशीही आदित्य ठाकरे बोलतात. त्यानंतर ते सोहमला भेटतात, कडकडून मिठी मारतात. पुढे सोहम आणि पूजाला शुभेच्छा देतात आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उभे राहतात. 

आदित्य ठाकरे सोहम आणि पूजाला शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर पोहोचल्यानंतर खाली उभे असलेले फोटोग्राफर्सचे कॅमेरेही आदित्य ठाकरेंवर खिळले. काही वेळानं फोटोग्राफर्सनी आदित्य ठाकरेंना 'आदित्य वेट वेट वेट...', असं म्हणत हाका मारायला सुरुवात केली. त्यावर आदित्य ठाकरे खळखळून हसले आणि म्हणाले, 'मी आहे, मी आहे... बाकीच्यांनाही फोटो काढायचेत...' आणि फोटोग्राफर्सना पोज देऊन आदित्य ठाकरे तिथून निघून गेले. 

 बांदेकरांच्या लेकाच्या रिसेप्शनला राजकीय दिग्गजांची मांदियाळी 

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून ओळख असणारे आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांनी काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात एका फार्महाऊसवर लग्नगाठ बांधली. त्यानंतर मुंबईत सोहम आणि पूजाचा शाही रिसेप्शनसोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक राजकीय दिग्गजांनी उपस्थिती लावलेली. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत. विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळी उपस्थित होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती