Akshaye Khanna Confession About Aishwarya Rai: सध्या बॉक्स ऑफिस (Box Office Collection) आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमानं (Dhurandhar Movie) जवळपास आपल्या ताब्यात ठेवलं आहे. या सिनेमात तसा मुख्य भूमिकेत रणवीर सिंह (Ranveer Singh) झळकला आहे. पण, सर्वाधिक चर्चा होतेय ती, अक्षय खन्नानं (Akshaye Khanna) साकारलेल्या रहमान डकैतची. 'धुरंधर' (Dhurandhar) पाहणारा प्रत्येकजण अक्षय खन्नावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसतोय. एवढंच काय तर, त्यानं साकारलेल्या डाकू रहमानच्या भूमिकेनं अनेकांना भूरळ घातलीय. अक्षय खन्नानं आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केलीय, त्यानं त्याच्या करिअरच्या सुरुवातीला विश्वसुंदरी ऐश्वर्या रायसोबतही स्क्रिन शेअर केलेली. अक्षय खन्ना ऐश्वर्या रायवर (Aishwarya Rai Bachchan) इतका भाळलेला की, त्यानं स्वतः याबाबात एका चॅटशोमध्ये जाहीरपणे कबुली दिलेली. तसेच, एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या आणि अक्षय खन्ना यांच्या नात्याची सर्वाधिक चर्चा झालेली. 

Continues below advertisement

एका प्रसिद्ध चॅट शोमध्ये बोलताना अक्षय खन्नानं जाहीरपणे कबुल केलेलं की, तो ऐश्वर्यावर भाळलेला. त्यानं सांगितलेलं की, तो ऐश्वर्याकडे एकटक पाहत बसायचा. तिच्यावर नजर हटवणं त्याच्यासाठी जवळपास अशक्यच होतं. एक काळ असाही होता, ज्यावेळी अक्षय खन्ना आणि ऐश्वर्याच्या नात्याच्या चर्चांनी इंडस्ट्रीमध्ये जोर धरलेला. करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण'च्या (Koffee With Karan) एका जुन्या एपिसोडमध्ये अक्षय खन्नानं ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचं मनापासून कौतुक केलेलं.

कधीकाळी रंगलेल्या ऐश्वर्यासोबत रिलेशनच्या चर्चा 

'कॉफी विथ करण' शोमध्ये त्याला विचारण्यात आलं की, बॉलिवूडमधील सर्वात सेक्सी महिला कोण? अभिनेत्यानं क्षणाचाही विलंब न लावता त्यावेळी उत्तर दिलेलं की, 'ऐश्वर्या राय...'. मिडिया रिपोर्टनुसार, 1990 च्या दशकात ऐश्वर्या आणि अक्षयच्या प्रेमसंबंधांची खूप चर्चा झाली होती. त्यांची नावं अनेकदा जोडली जात होती.

Continues below advertisement

'कॉफी विथ करण' शोमध्ये, अक्षय खन्नानं स्वतः ऐश्वर्याच्या सौंदर्यानं मोहीत झाल्याचं कबूल केलेलं. शोमध्ये, अभिनेत्यानं म्हटलेलं की, "जेव्हा जेव्हा मी तिला भेटायचो, तेव्हा मी तिच्यावरून नजर हटवूच शकत नव्हतो... पुरुषांसाठी हे अत्यंत लाजिरवाणं आहे. पण आता त्यांना सवय झाली आहे, लोक त्यांच्याकडे नुसते एकटक पाहत राहतात..."

अक्षय खन्ना पुढे म्हणालेला की, "बरं, मला कोणाकडे पाहण्याची सवय नाही. पण आपण वेड्यासारखं त्यांच्याकडे एकटक पाहतच राहतो... त्यांच्यावर नजर खिळतेच..." अक्षय खन्नानं ऐश्वर्याच्या सौंदर्याचं कौतुक करताना अजिबात मागे-पुढे पाहायचा नाही. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री भन्नाट होती. यामुळे त्यांच्या रिलेशनशिपबाबत अनेक चर्चा रंगलेल्या. मीडिया रिपोर्टनुसार, दोघेही सुमारे एक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्यात जवळीक वाढली. त्याचवेळी अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय यांच्यातील दुरावा वाढला, असं बोललं जातं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Smriti Irani On Akshaye Khanna Performance In Dhurandhar: 'त्याला ऑस्कर देऊन टाका...'; 'धुरंधर' पाहून स्मृती इराणींनाही चढलाय अक्षय खन्ना फिवर, पडद्यावरच्या रहमान डकैतसाठी कौतुकास्पद पोस्ट