Dhurandhar 2: सध्या सगळ्यांच्या ओठी एकाच सिनेमाचं नाव आहे, ते म्हणजे धुरंधर 2. सध्या या चित्रपटाच्या कथेपासून ते कलाकारापर्यंत प्रत्येक गोष्ट प्रचंड चर्चेत आहे. केवळ धुरंधरने नाही तर या सिनेमाच्या सिक्वल नाही बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड ब्रेक करण्यास सुरुवात केली आहे. धुरंधर द रिव्हेंज या चित्रपटातील एका सीनवरून मात्र सध्या नवा वाद सुरू झालाय. हा वाद टोकाला जाऊ नये म्हणून अभिनेता आर माधवनला सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत शीख समुदायाची माफी मागावी लागली आहे. या प्रकरणाची सध्या एकच चर्चा आहे.
नेमका वाद काय ?
धुरंधर 2 चित्रपटातील एकादृश्यावर शीख समाजातील काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता. यामध्ये आर माधवन पवित्र गुरुबानीचे पठण करताना सिगारेट ओढताना दिसत होता. यावर अलीकडेच शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि शिक्स इन महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्ष गुरुजीत सिंग खेर यांनी धुरंधर 2 चित्रपटाने शिखांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या नेत्याने आदित्य धर आर माधवन आणि रणवीर सिंह यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर अभिनेता आर माधवन याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. पवित्र गुरुबानीचे पठण करतानाच्या सीनमध्ये बोलण्यापूर्वी त्याने सिगारेट विझवली होती. असं तो म्हणालाय.
काय म्हणाला आर माधवन ?
' नमस्कार. मी आर माधवन . धुरंधरच्या परिवाराच्या वतीने तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही सगळ्यांनी या सिनेमाला इतकं प्रेम दिलं. अलीकडेच असं कळलं आहे की या चित्रपटातील एकादृश्यामुळे काही जणांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. एका दृश्यात गुरु गोविंद सिंग यांच्या एका ग्रंथातील काही ओळी वाचताना मी सिगारेट ओढली आहे, यावरून काही जणांना त्रास झालाय. मी तुम्हाला ग्वाही देतो की असं काहीही झालेलं नाही. मला आठवतंय त्या ओळींचा उच्चार करण्याआधी आदित्य धर यांनी मला सांगितलं होतं की 'ही ओळ म्हणण्याआधी खूप आधी तुम्ही सिगरेट विझवा.' या ओळी म्हणताना स्क्रीनवर कुठेही धूर दिसणार नाही ना तुमच्या हातात सिगारेट असेल. कारण या ओळी खूप पवित्र आहेत. त्यामुळे मी सिगारेट विझवली होती."
तो पुढे म्हणाला. 'जर तुम्ही त्या सीन मधील दृश्य पाहिलं तर तुम्हाला कळेल . माझ्या तोंडातून ना धूर निघतोय ना सीन संपेपर्यंत सिगारेटचा लवलेश नाही. कारण हे आम्हाला माहित आहे. आम्ही नकळतपणे ही कोणाच्या भावना दुखावू इच्छित नाही. आम्ही सगळे शीख समुदायाच्या बाजूचे आहोत. आम्ही त्यांचा आदर करतो. माझ्या कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मी आवर्जून सुवर्ण मंदिराला भेट देतो हे सर्वांना माहीत आहे. विश्वास ठेवा कोणालाही दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता . या दृश्याचा सुरुवातीला माझ्या हातात सिगारेट होती . माझी भूमिका स्मोक करते. पण जेव्हा सिन सुरू होतो . त्यावेळी मी सिगारेट विझवून टाकतो . पण तरीही कोणाला वाईट वाटलं असेल तर माफ करा. "असं म्हणत त्याने माफी मागितली आहे.
19 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला धुरंधर टू बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, आर माधवन, अर्जुन रामपाल ,संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांचा प्रमुख भूमिका आहेत.
