Dhurandhar 2 on OTT: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहच्या धुरंधर 2 या चित्रपटाने अक्षरशः धुरळा उडवला. आता धुरंधर 2 चं हे तुफान घराघरात पोहोचणार आहे. चित्रपटगृहांमध्ये 1700 कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाचे OTT वर येण्याचे मार्ग खुले झाले आहेत. अनेक ठिकाणी हा चित्रपट अजूनही हाउसफुल आहे. अनेक चित्रपटगृहातील यशस्वी कामगिरीनंतर धुरंधर : द रिव्हेंज चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुरळा उडवण्यासाठी सज्ज झालाय. (Dhurandhar 2 on OTT) गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट ओटीटीवर कधी दाखवला जाणार याबाबत तर कवितांना उधाण आले होते. शिवाय धुरंधरचा पहिला भाग नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला.  पण चित्रपटाच्या निर्मात्यांनी दुसऱ्या भागाचे हक्क नेटफ्लिक्सला न विकल्याच्या चर्चा होत्या. आता धुरंधर 2 चित्रपट नेमका कुठे व कधी रिलीज होणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 

Continues below advertisement

कुठे व कधी रिलीज होणार धुरंधर 2 ?

मिळालेल्या माहितीनुसार 'धुरंधर द रीवेंज ' या चित्रपटाचे डिजिटल हक्क जिओ हॉटस्टारने सुमारे 150 कोटी रुपयांचा करार करत विकत घेतले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंतचा कुठल्याही हिंदी चित्रपटासाठी सर्वात फायदेशीर ओटीटी डीलमधील हा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या मागील भागाच्या तुलनेत निर्मात्यांनी डिजिटल रिलीजच्या पद्धतीत बदल करण्याचे संकेत आधीच दिले होते. साधारणपणे चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांच्या आत ते चित्रपट ओटीपी प्लॅटफॉर्मवर येतो. पण धुरंधर 2 साठी ही वेळ काहीशी वाढलेली होती. 19 मार्च 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. 

आता धुरंधर 2 जिओ हॉटस्टार वर प्रदर्शित होणार असून  हॉटस्टार विलीनीकरणानंतर हा पहिला मोठा ब्लॉगबस्टर चित्रपट ठरणार आहे. व्यापार तज्ञांचे मते, हा चित्रपट ओटीटी वरील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरू शकतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोन हजार कोटींचा टप्पा ओलांडला तर तो अमीर खानचा दंगल चित्रपटाला मागे टाकेल. जरी निर्मात्यांनी आणि जिओ स्टुडिओने अद्याप  अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, हा चित्रपट 14 मे रोजी जिओ हॉटस्टार वर प्रदर्शित होऊ शकतो.

Continues below advertisement

धुरंधर 2 चे कथानक 

19 मार्च रोजी हिंदीसह सर्व दक्षिण भारतीय भाषांमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचा पेड प्रीमियर 18 मार्चला झाला होता. पहिल्या भागात रणवीर सिंह एका भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत दिसला होता, जो दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी अंडरवर्ल्डमध्ये घुसखोरी करतो. हा चित्रपट कंधार विमान अपहरण, 2001 संसद हल्ला आणि 26/11 मुंबई हल्ल्यांसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ‘धुरंधर 2’मध्ये आर. माधवन, संजय दत्त यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.