Dharmendra Left Out Of Oscars 2026 In Memoriam Segment: लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) 98वा अकादमी पुरस्कार (98th Academy Awards) सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडपासून (Bollywood) ते हॉलिवूडपर्यंतच्या (Hollywood) अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावलेली. आपल्या क्लासी आणि एलिगंट अंदाजानं अनेक सेलिब्रिटींनी लक्ष वेधलं. या वर्षी 'सिनर्स' (Sinners) आणि 'वन बॅटल ऑफ अनदर' (One Battle After Another) या सिनेमांनी सोहळ्यावर आपलं वर्चस्व गाजवलं.
ऑस्करच्या सोहळ्यात 'इन मेमोरियम' (In Memoriam) या विशेष विभागाचाही समावेश होतो. या सोहळ्यात एक विशेष कॅटेगरी असते, ज्याद्वारे गेल्या वर्षभरात निधन पावलेले अभिनेते, सिनेनिर्मात्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. रॉबर्ट रेडफोर्ड आणि रॉब रायनर यांसारख्या सिनेक्षेत्रातील दिग्गजांचं स्मरण करून त्यांचा गौरव करण्यात आला असला, तरी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा मात्र या सोहळ्यात कुठेही उल्लेख करण्यात आला नाही. ऑस्कर वाल्यांना आपल्या लाडक्या अभिनेत्याचा विसर पडल्यामुळे चाहते संतापले आहेत. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.
ऑस्कर 2026 'इन मेमोरियम' सेगमेंट
ऑस्कर 2026 मध्ये यंदाचं 'इन मेमोरियम' सेगमेंट आजवरच्या पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासातील सर्वात मोठं सेगमेंट होतं. आयोजकांनी सांगितलं होतं की, मागील वर्षांप्रमाणे पडद्यावर व्हिडीओ दाखवण्याऐवजी ते काहीतरी 'वेगळं' करतील. परिणामी, सेगमेंटमध्ये दोन अतिरिक्त उप-सेगमेंट समाविष्ट केले गेले, ज्या दरम्यान रॉब रीनर आणि रॉबर्ट रेडफोर्ड यांना त्यांच्या समवयस्कांनी सन्मानित केलं. दिग्दर्शक रॉब रीनर यांना त्यांच्या प्रसिद्ध चित्रपट 'व्हेन हॅरी मेट सॅली'चे स्टार बिली क्रिस्टल यांनी सन्मानित केलं. 'द वे वी वेअर' या चित्रपटात रॉबर्ट रेडफोर्डसोबत सह-अभिनय करणाऱ्या बार्बरा स्ट्रीसँड यांनी त्यांचे वर्णन 'भव्य, कमी लेखलेला अभिनेता' आणि 'शहाणा काउबॉय' असं केलं. त्यांनी सिनेमाच्या शीर्षकगीतातील काही ओळी गायल्या. राहेल मॅकअॅडम्स यांनी त्यांच्या सहकारी कॅनेडियन डायन कीटनला श्रद्धांजली वाहिली.
'इन मेमोरियम' सेगमेंटमध्ये धर्मेंद्रंचा विसर
गेल्या काही वर्षांत, ॲकॅडमी अवॉर्ड्सनं (Oscars) आपलं आकर्षण खऱ्या अर्थानं जागतिक पातळीवर विस्तारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. हा बदल 'इन मेमोरियम' (In Memoriam) सेगमेंटमध्ये स्पष्टपणे दिसून आला, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध कलाकारांचा गौरव करण्यात आला आहे. भारताकडून, इरफान खान आणि ऋषी कपूर यांसारख्या नावांचा ऑस्करच्या 'इन मेमोरियम' विभागात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, 2026 च्या या विभागात बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार धर्मेंद्र यांचा समावेश करण्यात आला नव्हता. धर्मेंद्र यांचे नोव्हेंबर 2025 मध्ये वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं.
धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना ही बाब अत्यंत विचित्र वाटली, विशेषतः अशा वेळी, जेव्हा 'ऑस्कर' पुरस्कार सोहळा अधिकाधिक सर्वसमावेशक होण्याचा आणि केवळ हॉलिवूडपुरता मर्यादित न राहता, स्वतःला खऱ्या अर्थानं एक आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतीय चाहत्यांना ही गोष्ट पचवणं कठीण गेलं, त्यांनी ट्विटरवर जाऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि संताप व्यक्त केला. ट्विटरवरील एका युजरनी लिहिलंय की, "ऑस्कर सोहळ्यात गेल्या वर्षभरात निधन झालेल्या व्यक्तींची यादी प्रदर्शित करण्यात आली. तरीही, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सिनेसृष्टीसाठी समर्पित केलं, अशा धर्मेंद्र या महान भारतीय अभिनेत्याचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही. जेव्हा आपल्या आदर्श व्यक्तींना (Icons) कोणत्याही प्रकारची दखल किंवा सन्मान मिळत नाही, तेव्हा मग या सोहळ्याचा इतका गाजावाजा कशासाठी करायचा? शेवटी, हा प्रामुख्यानं हॉलिवूडचाच सोहळा आहे, खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय सोहळा नाही..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
