Weekly Lucky Zodiac Signs : आजपासून मार्च (March 2026)महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, हा आठवडा अनेकांच्या जीवनात मोठे बदल घेऊन येतोय. 16 ते 22 मार्च 2026 हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ राहील. या काळात, महालक्ष्मी राजयोग तसेच, शनि नक्षत्र परिवर्तन होणार आहे. ज्यामुळे 7 राशींच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती, आर्थिक स्थिरता आणि नातेसंबंधांमध्ये नवीन ऊर्जा मिळू शकते. हा आठवडा कोणत्या राशींसाठी भाग्यवान राहील? साप्ताहिक भाग्यशाली राशींबद्दल (Weekly Lucky Zodiac Signs)जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजपासून सुरु झालेला आठवडा लकी ठरणार आहे. या काळात अनेक क्षेत्रांमध्ये शुभ योग निर्माण होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं दिसेल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी नवीन आठवडा फार खास असणार आहे. या काळात तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. तसेच, नोकरीत तुम्हाला प्रमोशनची संधीही मिळेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी आजपासून सुरु झालेला आठवडा फार लकी ठरणार आहे. या काळात मालव्य महापुरुष योग जुळून येणार आहे. त्याचबरोबर, सूर्याची युती होणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी हा काळ फार चांगला ठरु शकतो. व्यवसायात तुम्हाला लाभ मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा भरभराटीचा असणार आहे. या काळात जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात आहात तर तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. नवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी येणाऱ्या काळात अनेक चांगल्या संधी निर्माण होतील. तुम्ही हाती घेतलेली सर्व कामे हळुहळू मार्गी लागतील. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. त्याचबरोबर, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी ही चांगली संधी आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
