South Stars Divorce:  साऊथचा सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या (Aishwaryaa Rajinikanth) या दोघांनी आपला 18 वर्षाचा संसार मोडून एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. केवळं ऐश्वर्या आणि धनुष नाही तर या दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी देखील घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 


समंथा आणि नागा चैतन्य  ( Samantha,Naga Chaitanya)‘ये माया चेसावे’ या तेलगू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि नागा चैतन्यची भेट झाली. त्यानंतर  ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या सेटवर ते पुन्हा भेटले. 6 ऑक्टोबर  2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये समंथा आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटामुळे अनेकांना धक्का बसला.


नागार्जुन आणि लक्ष्मी दग्गुबती  (Nagarjuna)
अभिनेता नागार्जुन आणि लक्ष्मी दग्गुबती यांनी 1984 मध्ये लग्नगाठ बांधली, पण 1990 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नागार्जुन  आणि अमाला यांचा 1992 मध्ये विवाह सोहळा पार पडला. 


सौंदर्या आणि अश्विन रामकुमार (Soundarya Rajnikanth, Ashwin Ramkumar) 
ऐश्वर्या रजनीकांतची बहिण सौंदर्या रजनीकांतचा अश्विन रामकुमारसोबत 2016मध्ये घटस्फोट झाला. रिपोर्टनुसार, घटस्फोटानंतर सौंदर्यानं दुसरं लग्न देखील केले. 


प्रकाश राज (Prakash Raj)
दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील काम करणारे अभिनेता प्रकाश राज यांचा  ललिता कुमारी यांच्यासोबत  1994 मध्ये   विवाह सोहळा पार पडला. 2009 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर प्रकाश राज यांनी 2010 मध्ये  पोनी वर्मा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.    
 
प्रभू देवा (Prabhu Deva)
प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक प्रभू देवा यांनी राम लता यांच्यासोबत  1995 मध्ये लग्न केले. राम लता आणि प्रभू देवा यांचा 2011 साली घटस्फोट झाला. नंतर प्रभू देवा यांचं नाव नयनतारासोबत जोडण्यात आले. पण रिपोर्टनुसार प्रभू देवा आणि नयनतारा यांचा ब्रेकअप झाला. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha