Asmita Deshmukh Cheated In Dahi Handi Event: झी मराठीवरच्या (Zee Marathi) 'देवमाणूस' मालिकेनं (Dev Manus Serial) मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेचा दुसरा भाग सध्या प्रेक्षकांना भूरळ घालतोय. पण, पहिल्या भागातील कलाकारांच्या अभिनयाची जादू अजून प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. 'देवमाणूस'मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे, अस्मिता देशमुख (Asmita Deshmukh), जिनं मालिकेत डिम्पलची भूमिका साकारली आहे. मालिकेतील अभिनयामुळे डिम्पलला मोठी प्रसिद्ध मिळालेली. त्यामुळे आजही तिला अनेक इव्हेंट्ससाठी आमंत्रण दिलं जातं. पण, अशाच एका इव्हेंटमध्ये तिची मोठी फसवणूक झाल्याचा दावा तिनं केला आहे. यासंदर्भात तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेत्री अस्मिता देशमुखनं (Actress Asmita Deshmukh) व्हिडीओमध्ये म्हटलंय की, "नमस्कार मी अस्मिता देशमुख,व्हिडीओ बनवण्या मागचं कारण एकच आहे की, जेवढे सेलिब्रेटी आहेत किंवा जेवढे रील स्टार आहेत, तेवढ्या सगळ्यांना मला अलर्ट करायचंय... एक माहिती मला तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवायचीय. मध्यंतरी मी दहीहंडीचा एक इव्हेंट केलेला. तो इव्हेंट मला सुजित सरकाळे यांनी दिलेला... माझ्यासोबत इतरही काही सेलिब्रिटी त्या दहीहंडीच्या इव्हेंटला होते... त्या ठिकाणी आलेला अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचाय. अशी घटना तुमच्यासोबत घडू नये, यासाठी मी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या सुजितनं मला अर्धे पैसे पाठवले आणि अर्धे पैसे तो मला इव्हेंटच्या आधी देणार होता.
"मी त्या इव्हेंटच्या ठिकाणी गेले, तो इव्हेंट केला. त्यानंतर त्यानं मला पैसे पाठवल्याचे काही स्क्रीनशॉर्ट्स पाठवले. स्क्रीन शॉर्ट्समध्ये दिसतंय की, पैसे पाठवले आहेत... पण खरंतर माझ्या अकाउंटला ते पैसे आलेच नव्हते... त्यावेळी त्यानं मला सर्वर डाऊन आहे... बँकेचा इशू आहे, अशी कारणं दिली. तरीही मी आठवडाभर वाट पाहिली... त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, एक खूप मोठा स्कॅम माझ्यासोबत झालाय...", असं अभिनेत्री अस्मिता देशमुखनं सांगितलं.
"हा स्कॅम इतर लोकांसोबतसुद्धा घडू शकतो..."
पुढे बोलताना अभिनेत्री अस्मिता देशमुखनं सांगितलं की, "हा स्कॅम इतर लोकांसोबतसुद्धा घडू शकतो. दाखवताना त्यानं असं दाखवलं की, मी तुम्हाला पैसे पाठवलेत पण तुमच्याच अकाउंटला ते आलेले नाहीत. हा स्कॅन Phone Pay, Google Pay या माध्यमातून होतोय. मी बऱ्याचदा त्याच्याकडे माझ्या पैशांची मागणी केली, त्याला समजावलं, पोलीस स्टेशनमध्येसुद्धा याविरुद्ध कम्प्लेंट केली. पण त्यांना सुद्धा त्यांनं गंडवलं..."
"मला तुम्हा सगळ्यांना एकच कळकळीची विनंती करायची आहे की, सुजित सरकाळे या इव्हेंट मॅनेजरसोबत तुम्ही कधीच कोणता इव्हेंट करू नका... आणि जर का तुम्ही कोणता इव्हेंट करत असालच, तर तिथे जायच्या आधी त्याच्याकडून पूर्ण पैसे घ्या... ते पैसे पूर्ण आले आहेत की, नाही याची पूर्ण तपासणी करा आणि मगच त्या इव्हेंट ला जा... कारण ही फसवणूक माझ्या बाबतीत झाली आहे, जी तुमच्या बाबतीतही होऊ शकते. तुमच्यासोबत असं काही घडू नये यासाठी मी हा व्हिडीओ बनवला आहे. त्यानं मलाच नाही तर माझ्यासारख्या अनेक जणींना फसवलं आहे...", असं अस्मिता देशमुखनं सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :