Deool Band 2 Teaser Launch : गेल्या काही दिवसांपासून देऊळ बंद 2 (Deool Band 2) या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे . 2015 मध्ये आलेला देऊळ बंद या चित्रपटाचा दुसरा भाग तब्बल 11 वर्षांनी प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे स्वामीभक्त आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. देऊळ बंद 2 या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटाचा टीचर अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी स्वामी भक्तांनी प्रवीण तरडे आणि कलाकारांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. स्वामी भक्तांच्या मांदियाळीत प्रवीण तरडे आणि संपूर्ण टीमने चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला. यानंतर प्रवीण तरडेची पत्नी व अभिनेत्री स्नेहल तरडे यांना भावना अनावर झाल्या. चित्रपटाविषयी बोलताना त्या प्रचंड भावनिक झाल्या होत्या.
काय म्हणाल्या स्नेहल तरडे ?
अभिनेत्री स्नेहल तरडे म्हणाल्या, " हा चित्रपट आम्ही समर्पित करतोय अशा स्त्रियांना, ज्या आपल्या कुटुंबासाठी, परिवारासाठी आपल्या सर्वस्व कोणाला लावतात. लढत असतात,कष्ट करत असतात. त्यांच्या कष्टाची कोणी दखल घेवो, न घेवो त्यांना फरक पडत नाही. त्या कष्टाचा त्यांना बदला मिळो, न मिळो त्यांना फरक पडत नाही. उद्या आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी लढत राहतात. शेवटच्या श्वासापर्यंत मुला बाळांसाठी कष्ट सोसत असतात अशा स्त्रियांना 'देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची ' हा चित्रपट समर्पित करत आहोत. स्वामींचे पुन्हा एकदा खूप खूप आभार.त्यांनी आम्हाला ही संधी दिली. काम करण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली.चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे निर्माते कैलाश वाणी यांचे खूप आभार. " असं स्नेहल तरडे म्हणाल्या. चित्रपटाविषयी बोलताना त्यांना भरून आले होते.
कधी प्रदर्शित होणार चित्रपट ?
2015 मध्ये स्वामी समर्थांच्या महिमेवर आधारित देऊळ बंद हा सिनेमा प्रचंड गाजला. पहिल्या भागात स्वामींनी परदेशातून आलेल्या शास्त्रज्ञाच्या आलिशान चर्चा कीतून प्रवास केला होता.आता देऊळ बंद 2 मध्ये स्वामी एका गरीब महिलेच्या सामान्य दुचाकीवरून प्रवास करताना दिसणार आहेत.आणखी एका सामान्य कुटुंबाची,असामान्य गोष्ट या चित्रपटातून पाहिला मिळणार अस दिसतय. 21 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे .दरम्यान आज या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात टिझर लॉन्च चा हा कार्यक्रम पार पडला.
